अज्ञातांनी फोडल्या 'तेजस'च्या काचा

देशातील सर्वात वेगवान आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या 'तेजस' रेल्वेवर रविवारी दगडफेक झाल्याचं समोर आलं आहे. या रेल्वेच्या काचा काही अज्ञातांनी फोडल्या आहेत. रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पातील तेजस एक्स्प्रेसचा लोकार्पण सोहळा, सोमवारी 22 मे रोजी होणार आहे. पण यापूर्वीच या ट्रेनवर दगडफेक करुन त्याच्या काचा फोडल्याचं समोर आलं आहे. दिल्लीकडून मुंबईकडे ही ट्रेन येत असताना त्याच्या काचा फोडल्या असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


हेही वाचा

22 मे पासून धावणार हायस्पीड 'तेजस'


ताशी तब्बल 200 किलोमीटर वेगानं धावू शकणारी 'तेजस' शुक्रवारी दिल्लीहून मुंबईत दाखल झाली. 22 तारखेपासून ही गाडी सीएसटी ते करमाळी (गोवा) दरम्यान धावणार आहे. रेल्वेनं शनिवारी या गाडीचं वेळापत्रक जाहीर केलं. 'तेजस'च्या पहिल्या प्रवासाबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असताना दगडफेकीचा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या