नवी मुंबईतील तारघर रेल्वे स्थानक तपासणीसाठी सज्ज

बहुप्रतिक्षित नवी मुंबई (navi mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळ 8 ऑक्टोबर रोजी सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच तारघर (targhar) रेल्वे स्थानक हे नवी मुंबई विमानतळाच्या (navi mumbai airport) जवळ असल्याने महत्त्वाचे स्थानक म्हणून मानले जात आहे.

असे असताना आता तारघर रेल्वे स्थानक शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) आणि मध्य रेल्वे अधिकाऱ्यांकडून अंतिम तपासणीसाठी सज्ज आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

2 लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेले आणि नुकतेच बांधलेले स्टेशन एक विकसित ट्रान्झिट सेंटर म्हणून डिझाइन केले आहे.

हे स्थानक हार्बर लाईन, कोस्टल मेट्रो आणि नियोजित विमानतळ स्कायट्रेन यांना जोडणारे एक महत्त्वाचे इंटरचेंज हब म्हणून काम करणार आहे.

यामुळे विमानतळावरील प्रवासी आणि नियमित सर्वसामान्य प्रवाशांसाठी वाहतूक सोईस्कर ठरणार आहे.

या स्थानकामध्ये 50,000 चौरस फूट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले कॉन्कोर्स क्षेत्र आहे ज्यावर पॅरामीट्रिक डिझाइनमध्ये पॉली कार्बोनेट शीट रूफिंग आहे.

तसेच प्रत्येकी 7.5 मीटर रुंद असलेले दोन मार्ग प्लॅटफॉर्मला स्टेशनच्या फोरकोर्ट आणि आसपासच्या भागांशी जोडतात.

स्थानकाचे स्ट्रक्चरल काम पूर्ण झाले आहे. सर्व सोईसुविधा, सबवे आणि प्लॅटफॉर्म फिटिंग्ज देखील बसवण्यात आल्या आहेत. सिडको आणि मध्य रेल्वेच्या अंतिम तपासणीनंतर प्रवाशांच्या वापरासाठी स्थानक खुले करण्यात येईल

पाच प्लॅटफॉर्ममध्ये तीन मिडल प्लॅटफॉर्म आणि दोन टर्मिनल प्लॅटफॉर्म आहेत. हे प्लॅटफॉर्म 270 मीटरपेक्षा जास्त लांबीचे आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी, स्टेशनवर तिकीट कार्यालयाजवळ विशिष्ट प्रतीक्षालये आहेत. तिथे जेवणाची सोय देखील उपलब्ध आहेत.

सुलभ शौचालय मॉडेलमध्ये अपंग व्यक्तींसाठी विशिष्ट तरतुदींसह शौचालये तयार करण्यात आली आहेत. 720 कार सामावून घेण्यासाठी एक मोठी पे-अँड-पार्क सुविधा देखील उपलब्ध आहे.

स्थानकातून बाहेर पडल्यावर प्रवाशांना निश्चित ठिकाणी जाण्यासाठी बस, कार आणि ऑटोरिक्षांसाठी एक नियुक्त ड्रॉप-ऑफ झोन उपलब्ध आहे, ज्यामध्ये वेटिंग लेन आहेत.


हेही वाचा

मध्य रेल्वेचा 1 ऑक्टोबरला कर्जत स्थानकात मेगाब्लॉक

अंधेरी मेट्रो स्टेशनवर हिंदी जाहिरात फलकाची मनसेकडून तोडफोड

पुढील बातमी
इतर बातम्या