एअर इंडियाची मालकी अखेर टाटा समूहाकडे

एअर इंडियाची जबाबदारी आता टाटा सन्सकडे असेल. टाटांनी १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. ती सर्वोच्च असल्यामुळे टाटाकडे एअर इंडियाची कमान देण्यात आलीय. ६८ वर्षानंतर पुन्हा एकदा टाटाकडे एअऱ इंडिया आलीय.

मोदी सरकारनं जुलै २०१७ मध्ये एअर इंडिया विकण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ती विकत घेण्याचा अनेकांकडून प्रयत्न सुरू होते. चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर एअर इंडिया विकली गेली आहे.

एअर इंडियाची मालकी मिळाल्यानंतर नवीन मालकाला त्याचं नाव आणि लोगो ५ वर्षे जपून ठेवावा लागेल. पांडे यांनी सांगितलं की, ५ वर्षांनंतर टाटा सन्सला हवे असल्यास एअर इंडियाचे नाव आणि लोगो हस्तांतरित करू शकतो. परंतु यामध्ये एक अट आहे की, हे नाव आणि लोगो फक्त कोणत्याही भारतीय अस्तित्वाला किंवा व्यक्तीला दिले जाऊ शकते. कोणतीही परदेशी व्यक्ती किंवा संस्था त्यात प्रवेश करू शकणार नाही.

एअर इंडिया’च्या खरेदीसाठी वेगवेगळ्या चार निविदा सरकारकडे आल्या होत्या. तरी सर्वाधिक बोली लावणारी ‘टाटा सन्स’ या स्पर्धेत आघाडीवर होते. ‘स्पाइसजेट’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनीही निविदा दाखल केली होती. मात्र सर्वश्रेष्ठ बोली लावणाऱ्या टाटांकडे एअर इंडियाचा कारभार सोपवण्यात येणार आहे हे आता स्पष्ट झालंय.

१९५३ साली भारत सरकारनं टाटा सन्सकडून एअर इंडियाची मालकी खरेदी केली होती. १९५३ मध्ये भारत सरकारनं एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला आणि टाटा सन्सकडून विमान कंपनीची मालकी खरेदी केली.

जेआरडी टाटा १९७७ पर्यंत अध्यक्ष म्हणून राहिले. कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड करण्यात आले. अशा स्थितीत एअर इंडियाला टाटा समूहाकडे परत येण्यास एकूण ६८ वर्षे लागली.


हेही वाचा

मुंबई विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी; चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण

वाहनांच्या कागदपत्रांना ३१ ऑक्टोबरपर्यंत वैधता

पुढील बातमी
इतर बातम्या