Advertisement

वाहनांच्या कागदपत्रांना ३१ ऑक्टोबरपर्यंत वैधता


वाहनांच्या कागदपत्रांना ३१ ऑक्टोबरपर्यंत वैधता
SHARES

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आणि परमिट म्हणजेच वाहन परवाना यांसारख्या वाहनांशी संबंधित आवश्यक कागदपत्रांची वैधता कोरोना महामारीमुळं ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वैध केली आहे. मोटार वाहन कायदा १९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ संबंधित कागदपत्रांच्या वैधतेबाबत हे पत्र जारी करण्यात आले आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, फिटनेस, परमिट, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी किंवा इतर कोणत्याही संबंधित कागदपत्रांची नोंदणी करण्यात आली नसेल, अशा कागपत्रांना ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वैध मानले जाईल.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या निर्णयामुळं वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, ३१ ऑक्टोबरनंतर वाहनांची नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

दरम्यान, सद्यस्थितीत देशात इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचे आकर्षण झपाट्याने वाढत आहे. लोक पर्यावरणाबद्दल जागरूक होत आहेत आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. अनेक ऑटो कंपन्या त्यांची इलेक्ट्रिक वाहने आणण्याचे काम करीत आहेत. इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन आवश्यक आहे. आता देशात EV चार्जिंग स्टेशनची संख्यादेखील सातत्याने वाढत आहे. पेट्रोलियम कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) पाच हजार पेट्रोल पंपांवर ईव्ही चार्जिंग स्टेशन बसवणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा