तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वे मार्गावरील मस्जिद बंदर ते करीरोड स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी लोकल वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. तसंच, ओव्हहेड वायर खाली आल्यामुळे लोकल जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

वाहतूक खोळंबली

शनिवारी सकाळीच्या सुमारास मस्जिद बंदर ते कारीरोड स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप जलद मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. याचा परिणाम उपनगरीय रेल्वे वाहतुकीसह लांबपल्ल्यांच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतलं आहे. मात्र, जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आल्याने प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.


हेही वाचा - 

‘या’ दिवशी राहणार पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग बंद


पुढील बातमी
इतर बातम्या