‘या’ दिवशी राहणार पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग बंद

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सैल झालेली दरड हटवण्यात येणार आहे. त्यामुळे १२ मार्च ते २० मार्चदरम्यान महामार्गावर ब्लॉक घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे.

SHARE

सैल झालेली दरड हटवण्याच्या कामासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १२ मार्च ते २० मार्चदरम्यान ब्लॉक घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे या काळात रस्ते मार्गाने पुण्याहून मुंबईकडे येण्याचा विचार करत असाल, तर आताच प्लान बदला.


काय असेल वेळ ?

१२ मार्च ते २० मार्च दरम्यान खंडाळा बोगद्याजवळ १५ मिनिटांचे विशेष ब्लॉक घेतले जातील. त्यामुळे पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी ब्लॉकच्या वेळांव्यतिरिक्त प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शुक्रवार ते सोमवार या कालावधीत महामार्गावर मोठ्या प्रमाणात ताण असतो म्हणून शुक्रवार १५ मार्च दुपारी ३.१५ ते सोमवार १८ मार्च दुपारी १२ वाजेपर्यंत कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. 

ब्लॉक १ - सकाळी १० ते १०.१५ 

ब्लॉक २ - सकाळी ११ ते ११.१५ 

ब्लॉक ३ - दुपारी १२ ते १२.१५ 

ब्लॉक ४ - दुपारी २ ते २.१५

ब्लॉक ५ - दुपारी ३ ते ३.१५हेही वाचा - 

मेन इन ब्ल्यू अवतरले आर्मी कॅपमध्ये!

ये दिवार टुटेगी कैसे? डायनामाईटच्या स्फोटानंतरही नीरव मोदीचा बंगला उभाच!
संबंधित विषय
ताज्या बातम्या