ये दिवार टुटेगी कैसे? डायनामाईटच्या स्फोटानंतरही नीरव मोदीचा बंगला उभाच!

शुक्रवारी बंगल्याच्या चोहोबाजूंनी स्फोटके पेरण्यात आली आणि नियंत्रीत स्फोटाच्या मदतीने बंगला पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कामासाठी ३० किलो स्फोटकांचा वापर झाला. तरीही बंगला पूर्णपणे जमीनदोस्त झाला नाही .

ये दिवार टुटेगी कैसे? डायनामाईटच्या स्फोटानंतरही नीरव मोदीचा बंगला उभाच!
SHARES

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी याचा अलिबाग येथील आलिशान बंगला शुक्रवारी डायनामाईट लावून उडवण्यात आला. मात्र या बंगल्याचं बांधकाम इतकं मजबूत आहे की डायनामाईटच्या स्फोटाने बंगल्याच्या चिंध्या उडण्याऐवजी बंगल्याचं बांधकाम केवळ खचलं आहे. त्यामुळे पुढील १५ ते २० दिवसांत हा बंगला मशिनच्या साहाय्याने पाडण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.


३० किलो स्फोटकांचा वापर

अलिबागच्या किहीम समुद्रकिनारी असलेला हा बंगला पाडण्यासाठी गेल्या महिनाभरापासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु बांधकाम मजबूत असल्याने बंगला जमीनदोस्त करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे डायनामाईटच्या स्फोटाने बंगला पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार शुक्रवारी बंगल्याच्या चोहोबाजूंनी स्फोटके पेरण्यात आली आणि नियंत्रीत स्फोटाच्या मदतीने बंगला पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कामासाठी ३० किलो स्फोटकांचा वापर झाला. तरीही बंगला पूर्णपणे जमीनदोस्त झाला नाही .


सीआरझेडचं उल्लंघन

मोदीचा हा आलिशान बंगला ३३ हजार चौ. फूट क्षेत्रफळावर बांधण्यात आला आहे. बाजारभावानुसार १०० कोटी रुपये मूल्याचा हा बंगला आहे. हा बंगला सीआरझेड (CRZ) नियमांचं उल्लंघन करुन बांधण्यात आला असल्याने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २ महिन्यांपूर्वी या बंगल्यावरील कारवाईला सुरूवात करण्यात आली.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

दगडी आणि आरसीसी बांधकाम असल्याने हा बंगला पाडण्यासाठी भींतीच्या पिलर्समध्ये गुरूवारी स्फोटके लावण्यात आली होती. या स्फोटकांना एका रिमोट कंट्रोलशी जोडण्यात आलं. या कामासाठी कर्मचाऱ्यांना लोणेरे येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं होतं.

अंमलबजावणी संचलनालयाने हा बंगला पीएनबी घोटाळ्याअंतर्गत जप्त केला होता. त्यानंतर तो स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला. गेल्या महिन्यात राज्य सरकारने हा बंगला पाडण्यात येईल, अशी माहिती दिली होती.हेही वाचा-

नीरव मोदीचा आलिशान बंगला डायनामाईटने उडवणार!

भारताला झटका, मेहुल चोक्सीनं सोडलं भारतीय नागरिकत्वसंबंधित विषय