कोविड पासपोर्ट म्हणजे काय? तो कसा मिळवायचा?

भारतानं नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणं ३१ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवली आहेत. फक्त पूर्वनियोजित मोजकी विमानं इतर देशांमध्ये उडत आहेत. काही देशांनी ठराविक देशांतून येणाऱ्या प्रवाशांना मज्जाव केला आहे.

जिथे निर्बंध कमी आहेत किंवा देशातील प्रवेश सुरू झाला आहे, तिथे अनेक प्रकारच्या चाचण्या (Covid test) कराव्या लागतात आणि विलगीकरणाचे (Quarantine) नियम लागू आहेत.

काही देशांनी ठराविक देशांतील लोकांवर विमानानं येण्यास बंदी घातली आहे. या परिस्थितीचा विचार करता इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) यांनी 'कोविड पासपोर्ट' (COVID Passport) लाँच करण्याचा विचार केला आहे.

कोव्हिड पासपोर्ट कसा असेल?

ग्लोबल एअरलाईन लॉबी एक खास प्रकारच्या मोबाइल फोन अॅपवर काम करत आहे, ज्याला जगभरात डिजिटल पासपोर्ट म्हटलं जाईल. या अ‍ॅपमध्ये प्रवाशाची कोव्हिड-19 चाचणी, लसीकरण प्रमाणपत्र यासारखी माहिती नोंदवली जाईल. या डिजिटल पासपोर्टमध्ये प्रवाशाच्या वास्तविक पासपोर्टची ई-कॉपीसुद्धा अपलोड केली जाईल, ज्यामुळे त्याची ओळख पटेल.

अ‍ॅप कधी लाँच होईल?

IATA नुसार हे मोबाइल अॅप डेटा साठवणार नाही. तर ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित असेल. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत हे अॅपल डिव्हाइससाठी लाँच केलं जाईल. यानंतर हे अँड्रॉईडसाठी लाँच केलं जाईल. परंतु ते कधी ते सांगण्यात आलेलं नाही. दुसरीकडे, IATA नं सर्व देशांना लस उपलब्ध होताच विमान वाहतूक कर्मचारी आणि आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी लसीकरण सुनिश्चित करायला सांगितलं आहे.

म्हणून लाँच केली जात आहेत?

वार्षिक मीटींगमध्ये IATA नं ही माहिती दिली की, २०१९ च्या आकडेवारीकडे बघता, आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास ९० टक्क्यांनी कमी झाला आहे. कोव्हिड-१९ मुळे अर्थव्यवस्थेला लागणाऱ्या झटक्यामुळे, एव्हिएशन व्यवसायामध्ये १.८ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत घट होईल.

याचाच परिणाम जगभरातील एव्हिएशन उद्योगातून कोट्यवधी नोकर्‍यासुद्धा गेल्या आहेत. ज्यामुळे जगातील बर्‍याच देशांना त्यातून वर येण्यासाठी बराच काळ लागण्याची अपेक्षा आहे. हे लक्षात घेता एव्हिएशन उद्योग लवकरात लवकर पुन्हा उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


हेही वाचा

'या' ५ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर स्पेशल झोन

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

पुढील बातमी
इतर बातम्या