Advertisement

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ
SHARES

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता सदर योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष  ॲड. अनिल परब यांनी दिली आहे. 

महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २७ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीनं सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणं शक्य नसल्यानं, तसंच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्यानं सदर योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यामुळं ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणं सवलत लागू राहणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा