कर्नाळ्याजवळ पूल खचला, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • परिवहन

मुसळधार पावसामुळे कर्नाळ्याजवळील पूल खचल्याने मुंबई-गोवा महामार्गावर साेमवार सकाळपासून वाहतूककोंडी झाली आहे. पुलाच्या २ किमी परिसरातील दोन्ही मार्गिकांवर वाहनांची गर्दी झाली आहे. अत्यंत धिम्या गतीने वाहतूक सुरू असल्याने मुंबईवरून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे भर पावसात हाल सुरू आहेत.

कधी खचला पूल?

मुंबईसह ठाणे आणि रायगडमध्ये शनिवारी सायंकाळपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. या मुसळधार पावसामुळेच सकाळी ८ वाजेच्या सुमारास कर्नाळ्याजवळीला पुलाखालचा भराव वाहून गेल्याने पूल खचला. हा पूल मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने पूल खचताच या मार्गावरील दोन्ही बार्जला वाहनांची प्रचंड गर्दी झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.

प्रवाशांचे हाल

सकाळी ८ वाजता हा पूल खचला असला अजूनही या मार्गावर वाहनांची गर्दी कायमच आहे. काही वाहने पर्यायी मार्गाचा वापर करून जात असली, तरी त्यांची संख्या बरीच कमी आहे. त्यामुळे एका बाजूला पावसाचा तडाखा बसत असताना दुसऱ्या बाजूला प्रवाशांना वाहनांमध्ये अडकून पडावं लागत असल्याने त्यांचे चांगलेच हाल सुरू आहेत.


हेही वाचा-

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग


पुढील बातमी
इतर बातम्या