SHARE

मुंबई आणि उपनगरासह ठाणे, नवी मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांना अनेक अडचणींसा सामोरे जावं लागत आहे.

 

पावसाच्या प्रत्येक अपडेटसाठी येथे क्लिक करा

'या' परिसरात साचलं पाणी

उपनगरात विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. हिंदमाता, किंग्ज सर्कल परिसरात पाणी तुंबलं आहे. दरम्यान सोमवारी दिवसभर पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

ठाणे आणि नवी मुंबईतही मुसळधार पावसामुळे पाणी साचलं. येथील अनेक घरात पाणी शिरल्याने महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाच्यावतीने पंप लावून पाणी उपसण्याचं काम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे ठाण्यात संरक्षक भिंत कोसळली. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.


रेल्वेची वाहतूक उशिरानं

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेवरही झाला. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिरानं सुरू आहे. त्यामुळे ऐन सकाळच्या वेळी प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे.


इतक्या पावसाची नोंद

सोमवारी पहाटे 5.30 पर्यंत कुलाब्यात 90 मिमी पावसाची, तर सांताक्रूझमध्ये 195 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर येत्या आठवडाभरापर्यंत असाच कायम राहणार असून येत्या २४ तासांत आणखी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


हेही वाचा - 

मेट्रो सिनेमाजवळ झाड पडून एकाचा मृत्यू, एक जण गंभीर

सोमवारी शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी

संबंधित विषय
ताज्या बातम्या