Advertisement

मुंबईतील पावसाचे Live Updates

SHARE

इथं मिळतील तुम्हाला मुंबईतील पावसाचे क्षणाक्षणाचे 'लाइव्ह अपडेट्स'. रस्ते वाहतूक असो किंवा लोकलची स्थिती, कुठे साचलंय पाणी, कुठे होतोय पाण्याचा निचरा, प्रशासन नेमकं काय करतंय, हवामानाच्या स्थितीपासून मुंबई शहर, उपनगरातील परिस्थितीपर्यंत सर्वकाही, एकाच पेजवर.

LIVE UPDATES

04:48 PM, Jul 15 IST
मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडक सागर ओव्हरफ्लो
02:48 PM, Jul 15 IST
गेटवे ऑफ इंडियाजवळ उंचच उंच लाटा


01:50 PM, Jul 15 IST
समुद्रकिनारी सतर्कता बाळगण्याचं पोलिसांचं आवाहन
01:48 PM, Jul 15 IST
मुंबईसह पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस
01:31 PM, Jul 11 IST
मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत
01:31 PM, Jul 11 IST
कल्याणजवळ गोदावरी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड
10:47 AM, Jul 11 IST
मुंब्रा बायपास रोडला तडे

10:41 AM, Jul 11 IST
४८ तासानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार

गेल्या २४ तासात सांताक्रुज वेधशाळेनं ११४ मिमी पावसाची नोंद केली असून कुलाबा वेधशाळेनं ४१ मिमी पावसाची नोंद केली आहे. गेले चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत दर दिवशी १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. येत्या ४८ तासानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे.

मुंबईत पुढचे ३ तास तरी पावसाची शक्यता नसली तरी ठाणे, विरार, पालघर, या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

10:39 AM, Jul 11 IST
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठी वाहतूककोंडी, वांद्रेच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूककोंडी
09:17 AM, Jul 11 IST
डोंबिवलीतील नाल्यात २ तरुण बुडाले, एनडीआरएफच्या मदतीने दोघांचा शोध सुरू
09:17 AM, Jul 11 IST
पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-भाईंदर वाहतूक सुरळीत, विरार-ते चर्चगेट ५ गाड्या रवाना

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते भाईंदर वाहतूक सुरळीत असली, तरी अद्याप विरार ते चर्चगेट वाहतूक पूर्णपणे सुरू झालेली नाही. नालासोपारा रेल्वे स्थानकातील ट्रॅकवर पाणी भरल्याने मागील २ दिवसांपासून वसई ते विरार रेल्वे सेवा ठप्प होती. परंतु सकाळपासून या विरारवरून ५ लोकल गाड्या चर्चगेटच्या दिशेने रवाना झाल्या. नालासोपारा स्थानकातील पाण्याची पातळी कमी झाल्याने या मार्गावरून हळूहळू लोकल रवाना करण्यात येत आहेत.


 


 

07:38 PM, Jul 10 IST
विरारपुढे एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना विशेष बसने मुंबईत अाणणार
Advertisement
07:32 PM, Jul 10 IST
पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या अाहेत.

Image may contain: car and outdoor

07:22 PM, Jul 10 IST
वांद्रे येथे सेंट पाॅल रोडवर झाड कोसळल्यानं कारचं मोठं नुकसान झालं.


06:42 PM, Jul 10 IST
सीएसएमटी ते पनवेल लोकल सेवा विस्कळीत
06:42 PM, Jul 10 IST
मानखुर्द-गोवंडीदरम्यान रेल्वे रूळाला तडा
05:15 PM, Jul 10 IST
पावसाचा जोर कमी झाला असला तरी कुर्ला पश्चिममध्ये अजूनही रस्त्यावर पाणी साचलेलं अाहे






05:10 PM, Jul 10 IST
एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी एनडीअारएफच्या टीमने नालासोपारा स्थानकात धाव घेतली
Advertisement
05:05 PM, Jul 10 IST
वडोदरा एक्स्प्रेसमधील भुकेल्या प्रवाशांसाठी एनडीआरएफने जेवणाची व्यवस्था केली



04:57 PM, Jul 10 IST
सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद बंदर स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा