तुर्भे व वाशी स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास ओव्हरहेट वायर तुटल्यानं वाहतूक वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळं प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला समोर जावं लागलं.
वाहतूक ठप्प
ओव्हरहेड वायर तुटल्यानं ठाण्याहून वाशीला जाणाऱ्या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली. याबाबत माहिती मिळताच रेल्वे प्रशासनानं ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम हाती घेतलं. तसंच, लवकरच वाहतूक सुरळीत होईल, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
स्थानकात प्रवाशांची गर्दी
गर्दीच्या वेळी ओव्हरहेट वायर तुटल्यामुळं तुर्भे स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. तसंच, काही प्रवाशांनी लोकल सुरळीत होण्याची वाट न पाहता रुळांवरून चालत कार्यालयं गाठणं पसंत केलं. त्यामुळं रुळांवर प्रवाशांची गर्दी झाली होती.
हेही वाचा -
जेटच्या प्रवाशांसाठी एअर इंडियाची खास सवलत
माझ्या शापानेच करकरेंचा मृत्यू, साध्वी प्रज्ञा यांचं वादग्रस्त वक्तव्य