Advertisement

जेटच्या प्रवाशांसाठी एअर इंडियाची खास सवलत

जेट एअरवेजच्या प्रवाशांच्या मदतीला आता एअर इंडिया धावून आली आहे. जेटचं तिकीट असलेल्या प्रवाशांना एअर इंडिया सवलतीच्या दरात तिकीट देणार आहे. त्यामुळे जेटच्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळू शकेल.

जेटच्या प्रवाशांसाठी एअर इंडियाची खास सवलत
SHARES

आंतरराष्ट्रीय मार्गांवर पर्यटनासाठी आधीच तिकीट बुक करून ठेवलेल्या जेट एअरवेजच्या प्रवाशांवर सध्या पश्चातापाची वेळ आली आहे. जेट एअरवेजची सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने या प्रवाशांवर तिकीटाचे पैसे गमावण्यासोबतच ट्रीप रद्द करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत या प्रवाशांच्या मदतीला आता एअर इंडिया धावून आली आहे. जेटचं तिकीट असलेल्या प्रवाशांना एअर इंडिया सवलतीच्या दरात तिकीट देणार आहे. त्यामुळे जेटच्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळू शकेल.


'या' देशात जाता येईल

एअर इंडियाने गुरूवारी एक पत्रक काढून यासंदर्भातील माहिती दिली. या माहितीनुसार परदेशात जाण्यासाठी जेट एअरवेजचं तिकीट काढलेल्या प्रवाशांना सवलतीच्या दरांत एअर इंडियाचं तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खासकरून पॅरिस, लंडन, सिंगापूर, दुबई, हाँगकाँग, अबुधाबी, जेद्दाह आणि मस्कत इ. देशात जाणाऱ्या प्रवाशांना या सवलतीचा फायदा मिळेल.


गैरसोय टळणार

जेट एअरवेजच्या प्रवाशांसाठी सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने विशेष ऑफर दिली आहे. जेट एअरवेजच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तिकीट घेतलेल्या प्रवाशांना एअर इंडिया सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा देणार आहे. जेट एअरवेजचे तिकीट घेतलेले प्रवासी जेटची सेवा बंद पडल्याने संकटात सापडले आहेत. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एअर इंडियाने ही ऑफर दिली आहे.


प्रवाशांना दिलासा

जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यामुळे परदेशात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने ही खास सवलत देऊ केल्याचं जेट एअरवेजने म्हटलं आहे. ठराविक देशांत जाण्यासाठीच ही सवलत देण्यात आली आहे. यामुळे जेटच्या प्रवाशांना दिलासा मिळण्यासोबतच एअर इंडियाच्या गंगाजळीतही काही प्रमाणात का होईना परंतु भर पडणार आहे हे नक्की.



हेही वाचा-

पगार द्या, तेव्हाच हटू, जेट एअरवेजच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांचा ठिय्या

अखेर जेटची सेवा बुधवारी रात्रीपासून बंद



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा