एसी लोकलचे दर फर्स्ट क्लासपेक्षा कमी?

बहुचर्चित आणि बराच काळ रखडलेली एसी लोकल १ जानेवारीपासून मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे. चर्चगेट ते विरार या मार्गावर ही एसी लोकल धावणार असून ८ स्थानकांवर या लोकलला थांबा देण्यात येणार आहे. पण, या एसी लोकलचं भाडं नेमकं किती असेल, असा प्रश्न प्रवाशांना सतावत होता. त्यावर या लोकलचं भाडं सामान्य लोकलच्या फर्स्ट क्लासपेक्षा कमी असेल, असं सुतोवाच पश्चिम रेल्वे प्रशासनाने केलं आहे. एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे.

१७० रुपयांपेक्षा कमी?

विरार ते चर्चगेट ‘फर्स्ट क्लास’चं एकेरी प्रवासाचे तिकीट १७० रुपये असून एसी लोकलचं तिकीट त्यापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने तयार केला आहे. पण, अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवण्यात आला आहे.

कधीपासून होणार सुरुवात?

येत्या नवीन वर्षात या एसी लोकलच्या प्रवासाला सुरूवात होणार आहे. १ जानेवारी पासून ही सेवा मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे.

'या' स्थानकांवर मिळणार थांबा

एसी लोकलच्या अजूनही बऱ्याच चाचण्या व्हायच्या आहेत. त्या चाचण्या झाल्यावर एसी लोकलसाठी डहाणू लोकलप्रमाणेच थांबे दिले जाणार आहेत. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, भाईंदर, वसई, विरार या ८ स्थानकांचा यांत समावेश असेल. एका लोकलला स्थानकावर ३० ते ४० सेकंदांचा थांबा असतो. पण, एसी लोकलचे स्वयंचलित दरवाजे उघडे किंवा बंद व्हायला उशिर झाल्यास वेळापत्रक कोलमडू शकेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.


हेही वाचा-

एसी लोकलवर घडणार ‘मुंबई दर्शन’


पुढील बातमी
इतर बातम्या