Advertisement

एसी लोकलवर घडणार ‘मुंबई दर्शन’


एसी लोकलवर घडणार ‘मुंबई दर्शन’
SHARES

मुंबईत १ जानेवारीपासून एसी लोकल सुरू होत आहे. या लोकलमध्ये बसून गारेगार प्रवासाचा आनंद लुटतानाच प्रवाशांना ‘मुंबई दर्शन’ही बसल्याजागी घडणार आहे. ही लोकल ‘आमची मुंबई’ या थीमवर सजवण्यात येत असून मुंबईतील सौंदर्यस्थळांचा या सजावटीत समावेश असणार आहे. त्यामुळे खासकरून मुंबईबाहेरून येणाऱ्या प्रवाशांना या लोकल ट्रेनद्वारे पहिल्याच नजरेत 'मुंबई दर्शन' घडणार आहे.


कुठून कुठे धावणार?

ही एसी लोकल देशात उपनगरीय लोकल सेवेत पहिलीच वातानुकुलित गाडी असणार आहे. त्यामुळे तिचं वेगळेपण जपण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. ही एसी लोकल पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार मार्गांवर धावणार आहे. 'मुंबई दर्शन'


चित्र निवडीवर चर्चा

या संकल्पनेसाठी एशियन पेंट्स कंपनीच्या सामाजिक बांधिलकी धोरणानुसार साहाय्य करण्यात येणार आहे. शिवाय, या उपक्रमात 'स्ट्रीट आर्ट इंडिया फाऊंडेशन'ही सहभाग घेणार आहे. त्यासाठी या दोन्ही संस्थांशी चर्चा सुरू असून या चर्चेतूनच अंतिम चित्रांची निवड करण्यात येईल.


सजावटीचं काम कुणाकडे?

काही दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वेच्या मुख्य इमारतीबाहेर ‘स्ट्रीट आर्ट इंडिया फाऊंडेशन’च्या एडुआर्ड कोबरा यांनी काढलेल्या महात्मा गांधीजींच्या भित्तीचित्राचं कौतुक झालं होतं. त्यानंतर त्यांच्याकडेच ही लोकल सजवण्याचं काम सोपवण्यात आलं. लोकलच्या बाह्यभागावर जाहिराती न झळकवता तिथे मुंबईची ओळख असणारी पर्यटनस्थळे चितारून मुंबईचं वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

एसी लोकलची घोषणा पहिल्यांदा २०१२ -१३ मध्ये करण्यात आली होती. पण, अखेर मुंबईकरांचं हे स्वप्न २०१८ मध्ये पूर्ण होणार आहे.



हेही वाचा-

'मेधा' लोकलला ट्रॅक सापडेना!

मोनोराणी पुन्हा ट्रॅकवर कधी? कुणालाच माहिती नाही


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा