'मेधा' लोकलला ट्रॅक सापडेना!


SHARE

मध्य रेल्वेच्या ताफ्यात 'मेधा' ही अत्याधुनिक लोकल सोमवारी दाखल झाली. पण, ती नेमकी कुठे आणि कधी चालवायची? यावर अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे ही लोकल ट्रॅकवर प्रत्यक्षात धावण्यास काही दिवस लागण्याची शक्यता आहे.

चेन्नईतील 'इंटिग्रल कोच फॅक्टरी' (आयसीएफ) येथे तयार झालेली ही अत्याधुनिक लोकल मुंबईतील मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली आहे. पण अजूनही ही लोकल चालवण्याचा मुहूर्त रेल्वे प्रशासनाला सापडलेला नाही. त्यामुळे वाजत गाजत आणलेली ही लोकल कारशेडमध्ये धूळ खात उभी आहे.


मेधा लोकलची वैशिष्ट्य:

 • मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-२ (एमयूटीपी-२) अंतर्गत बांधणी
 • बम्बार्डिअर लोकलच्या धर्तीवर मेधा लोकलची बांधणी
 • ‘थ्री फेस आयजीबीटी’ या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मेधाची ‘अ‍ॅडव्हान्स’ लोकल म्हणून ओळख
 • ही लोकल एमयूटीपी-१ आणि एमयूटीपी-२ पेक्षा अत्याधुनिक
 • या लोकलची किंमत ४३.२३ कोटी रुपये
 • तर, बम्बार्डिअर लोकल बनविण्यासाठी ४४.३६ कोटी खर्च
 • मेधाची क्षमता ताशी ११० किलोमीटर प्रति तास इतकी
 • लोकलची प्रवासी क्षमता ६,०५० इतकी
 • लोकलमध्ये एकूण १,१६८ सीट्स
 • फ्रेश एअर कुलिंग क्षमता १६ हजार प्रति तास मीटर क्युबिक
 • मार्च २०१८ पर्यंत १३ नवीन लोकल मध्य रेल्वेत दाखल होणार
 • त्यासाठी ७१४.१० कोटींचा खर्च अपेक्षित


मेधा लोकल लवकरच मुंबईतील रेल्वेच्या ट्रॅकवर धावेल. पण, ही लोकल पश्चिम रेल्वेवर धावेल की मध्य रेल्वेवर याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. भारतीय बनावटीच्या ४ मेधा आणि २० बम्बार्डिअर लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य‌ रेल्वेहेही वाचा-

जोगेश्‍वरीकरांना हवीय विशेष लोकल ट्रेन

सीएसएमटी-पनवेल, वांद्रे-विरार एलिव्हेटेड रेल्वेला मुहूर्त कधी? वर्ष उलटूनही प्रकल्प कागदावरच

सीएसटीत पहिल्यांदाच 'दुहेरी' सरकता जिनासंबंधित विषय
ताज्या बातम्या