Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

सीएसटीत पहिल्यांदाच 'दुहेरी' सरकता जिना


सीएसटीत पहिल्यांदाच 'दुहेरी' सरकता जिना
SHARES

रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत प्रवाशांच्या सोईसाठी बहुतांश सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांत सरकते जिने बसवले आहेत. पण सर्वाधिक गर्दीच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम)वर अद्याप एकही सरकता जिना बसवण्यात आलेला नव्हता. पण येत्या काही दिवसांतच या टर्मिनसमध्ये सरकता जिना दिसू लागेल. तोदेखील केवळ चढणारा नव्हे, तर उतरणाराही.


चढ-उतार करणारा जिना

मध्य रेल्वेच्या बोर्डाकडून पहिल्यांदाच दोन्ही बाजूचा म्हणजेच चढ-उतार करण्यासाठी सरकता जिना बसवण्यात येणार आहे.


कुठे असेल जिना?

सीएसटीएमच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून हा सरकता जिना प्लॅटफाॅर्म १८ ला जोडेल. या जिन्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. या सरकत्या जिन्याचा फायदा दिव्यांग, वयोवृद्ध आणि गर्भवती महिलांना होईल.


जिना १ कोटी २० लाखांचा

या दोन्ही बाजूच्या दिशेच्या सरकत्या जिन्याची किंमत जवळपास १ कोटी २० लाख रुपये असेल.


अजून ३२ सरकत्या जिन्यांचा प्रस्ताव

मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर एकूण ५४ सरकते जिने बसवण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी २२ सरकते जिने बसवण्यात आले असून ३२ बसवायचे आहेत.

मध्य रेल्वेच्या स्थानकांवर एकूण २१४ सरकते जिने बसवण्यात येणार असून यापैकी सध्या ५४ सरकत्या जिन्यांना परवानगी मिळाली आहे. त्यापैकी २२ सरकते जिने बसवण्यात आले असून ३२ जिने जून २०१८ पर्यंत बसवण्यात येणार आहेत. यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.


प्रवाशांकडून पुरेपूर वापर

दादर, ठाणे, कल्याण इ. स्थानकांत सरकते जिने बसवल्यानंतर प्रवाशांकडून त्याचा पुरेपूर वापर करण्यात येत आहे. या प्रतिसादानंतर सरकत्या जिन्यांची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे.


'येथे' आहेत सरकते जिने

स्थानकजिने
दादर

कुर्ला

विद्याविहार

विक्रोळी

कांजूरमार्ग
भांडुप  
मुलुंड

ठाणे

डोंबिवली

कल्याण

 

उल्हासनगर

बदलापूर


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा