शनिवारीदेखील धावू शकते एसी लोकल!

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • परिवहन

उन्हाळ्याच्या दिवसांत पश्चिम रेल्वे प्रशासन मुंबईकरांना सरप्राइज देऊ शकतं. सद्यस्थितीत केवळ सोमवार ते शुक्रवार धावणारी एसी लोकल आता शनिवारीही चालवण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. देखभाल-दुरूस्तीसाठी सध्या एसी लोकल शनिवारी, रविवारी चालवली जात नाही.

प्रवाशांची आकडेवारी

एसी लोकलच्या प्रवाशांमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे. जानेवारी एसी लोकल सुरू झाल्यावर या लोकलमधून १.७७ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये २ लाख प्रवाशांनी या लोकलमधून प्रवास केला. तर मार्च महिन्यात ३.१३ लाख प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला.

प्रवासी क्षमता किती?

पूर्वी या लोकलमध्ये दररोज ६६७ प्रवासी प्रवास करत होते. त्यात वाढ होऊन दररोज ७९८ प्रवासी एसी लोकलने प्रवास करत आहेत. या लोकलमध्ये १०२८ प्रवाशांसाठी बसण्याची सुविधा असून एका एसी लोकलमध्ये एकूण ५९६४ प्रवासी प्रवास करू शकतात.

तापमान घटवणार

एसी लोकलमधील तापमान २३ डिग्री सेल्सिअस इतकं ठेवण्यात आलं आहे. मात्र उन्हाळ्यात बाहेरचं वाढणारं तापमान लक्षात घेता ट्रेनमधील तापमान २१ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आणण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. जेणेकरून प्रवाशांना थंडगार प्रवास करता येईल.


हेही वाचा-

भाजपा कार्यकर्त्यांचा एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास, प्रवाशांनी उतरवलं खाली


पुढील बातमी
इतर बातम्या