Advertisement

भाजपा कार्यकर्त्यांचा एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास, प्रवाशांनी उतरवलं खाली


भाजपा कार्यकर्त्यांचा एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास, प्रवाशांनी उतरवलं खाली
SHARES

सोशल मीडियावर सध्या लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ चांगला व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही भाजपा कार्यकर्ते एसी लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करताना दिसत आहेत. इतर सहप्रवाशांनी तिकीटांची विचारणा केल्यावर त्यांच्याजवळ तिकीट आढळून आलं नाही. त्यामुळे सहप्रवाशांनी त्यांना खाली उतरवलं.


पक्षाच्या नावावर धमकी?

जेव्हा इतर सहप्रवाशांनी विनातिकीट प्रवास करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना खाली उतरण्यास सांगितलं. तेव्हा त्यांनी पक्षाच्या नावे त्यांना धमकवण्यास सुरूवात केली. यामुळे इतर सहप्रवाशांचा पारा देखील वर चढला.


बघा नेमकं काय झालं?



म्हणे, भाजपामुळे ट्रेन सुरू?

ही एसी लोकल ट्रेन काँग्रेस सरकारच्या काळात सुरू होऊ शकली नाही, तर भाजपा सरकारने एसी लोकल सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच इतरांना एसीत बसून प्रवास करणं शक्य झाल्याचं या भाजपा कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं.

हे वक्तव्य ऐकून जेव्हा सहप्रवाशांच्या रागात भर पडली, तेव्हा या भाजपा कार्यकर्त्यांनी ट्रेनमधून खाली उतरणचं पसंत केलं.



हेही वाचा-

धावत्या लोकलमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा