एसी लोकलमध्येही घुसले फुकटे, ११ जणांवर कारवाई !

पश्चिम, मध्य अाणि हार्बर रेल्वेतून फुकटचा प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांवर दरवर्षी कारवाई केली जात अाहे. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सोमवारी नाताळच्या दिवशी दाखल झालेल्या एसी लोकलमधूनही अनेक फुकट्यांनी प्रवास केल्याचं समोर अालं अाहे. अशा तब्बल ११ फुकट्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वेनं कारवाई केली अाहे.

तिकीट दराबाबत संभ्रम कायम

साधारण लोकल अाणि एसी लोकलच्या तिकीटाच्या दरांबाबत अद्याप प्रवाशांमध्ये संभ्रम असल्यामुळे अापल्या नाॅर्मल तिकिटावर किंवा पासवर अनेक प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केल्याची घटना घडली अाहे. काही जण कोणतेही तिकीट न अाकारता एसी लोकलमधून प्रवास करत होते. अशा फुकट्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने ११ जणांना दंड अाकारला अाहे.

४ हजारांचा दंड वसूल

टीसींनी एसी लोकलच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ११ जणांवर कारवाई करत ४ हजार १४५ रुपयांचा दंड वसूल केला अाहे. त्यामुळे एसी लोकललाही फुकट्या प्रवाशांचा फटका बसणार, हे अाता समोर अाले अाहे.

दुसऱ्या दिवशी २ हजार प्रवाशांचा गारेगार प्रवास

एसी लोकलच्या दुसऱ्या दिवशी तब्बल २ हजार ९१ प्रवाशांनी थंडगार असा प्रवास केला. त्यातून पश्चिम रेल्वेला ९८ हजार ९४० रुपयांचा फायदा झाला अाहे.


हेही वाचा - 

मुंबईकरांनो, कन्फ्युज नका होऊ!, 'हे' आहेत एसी लोकलचे दर आणि वेळापत्रक

पहिल्याच दिवशी एसी लोकलने कमावले ६२ हजार ७४६ रुपये

पुढील बातमी
इतर बातम्या