विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून १३.९७ लाखांचा दंड वसूल, पश्चिम रेल्वेची कारवाई

लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष तपासणी मोहीम राबवली होती. या मोहिमेर्तंगत १५ ते २० मे या ५ दिवसांत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १३ लाख ९७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

५ दिवस मोहीम

या मोहिमेर्तंग प्रथम श्रेणीच्या डब्याजवळ १५ ते २० मेदरम्यान १६० तिकीट तपासनीस आणि ५ रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यावेळी विनातिकीट प्रवास केल्याप्रकरणी एकूण १४४४ तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, यामधून ४.२७ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसंच, स्पॉट चेकिंगमध्ये ३६८६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, यामधून ९.७० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. असा एकूण १३.९७ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

कुठे झाली तपासणी ?

मरीन लाइन, चर्नीरोड, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, खार, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि नालासोपारा या स्थानकांत ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दरदिवशी १६० तिकीट चेकिंग स्टाफ आणि ५ आरपीएफचे जवान अशा पथकानं तिकीट तपासणी केली.


हेही वाचा -

All The Best! आज लागणार बारावीचा निकाल

डाॅ. पायल आत्महत्या: तिन्ही आरोपी डाॅक्टरांचं निलंबन


पुढील बातमी
इतर बातम्या