विरार स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक बदलणार

पश्चिम रेल्वेच्या विरार स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक एका सरळ रेषेत नाहीत. त्यामुळे ऐन वेळी प्लॅटफॉर्म बदलले, तर प्रवाशांची धावपळ होऊन गोंधळ उडतो. असे होऊ नये म्हणून विरार स्थानकावर गुंतागुंतीचे फलाट क्रमांक सोईस्कर करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेच्या वतीने घेण्यात आला आहे. या नवीन प्लॅटफॉर्म क्रमांकांची अंमलबजावणी 12 आणि 13 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून करण्यात येणार आहे.

यापूर्वी तब्बल 8 फलाट असलेल्या बोरिवली स्थानकावर प्रवाशांना सोपे जाईल अशा स्वरुपात क्रमांक देण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेकडून आता अंधेरी, बोरीवलीपाठोपाठ विरार स्थानकातील प्लॅटफॉर्मचे क्रमांक देण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकात आठ प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मवरील सद्यस्थितीतील क्रमांक प्रवाशांप्रमाणेच मोटरमन वर्गालाही अडचणीचे ठरत आहेत. या स्थितीत प्रवाशांनीही या क्रमांकात बदल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नवीन बदल केले जाणार आहेत.

असे असतील बदल

सद्यस्थितीतील फलाट

नवीन फलाट क्रमांक
81
12
23
34
45
56
63टी
74टी


हेही वाचा -

बोरीवली स्थानकातील फलाटांची क्रमवारी बदलणार

आता मोबाईलवरच काढा मेट्रोची तिकिटं!

पुढील बातमी
इतर बातम्या