Advertisement

बोरीवली स्थानकातील फलाटांची क्रमवारी बदलणार


बोरीवली स्थानकातील फलाटांची क्रमवारी बदलणार
SHARES

बोरीवली रेल्वे स्थानकात एकूण दहा फलाट आहेत. मात्र या फलाटांची क्रमवारी सरळ रांगेत नसल्याने अनेकदा ट्रेन पकडताना रेल्वे प्रवाशांचा गोंधळ होतो. त्यावर तोडगा काढण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने या स्थानकांतील सर्व फलाट क्रमांक एका रांगेत करण्याचा निर्णय घेतला आहे. 3 आणि 4 जूनच्या मध्यरात्रीपासून नवीन क्रमांकाची मालिका कार्यान्वित होणार आहे.

बोरीवली पश्चिमेकडून विरारच्या दिशेने सुरू होणाऱ्या फलाटाचा क्रमांक 1 असा आहे. त्याला जोडूनच खालोखाल इंद्रप्रस्थ शॉपिंग मॉलला लागून दुसरा आणि त्यापुढे तिसरा फलाट असून या फलाटांचे क्रमांक अनुक्रमे 7 आणि 8 असे आहेत. हे फलाट लोकल ट्रेनच्या वापरासाठी आहेत. तर फलाट क्रमांक 1 पासून पुढे पूर्वेच्या दिशेने 2 ते 6, 6 अ आणि 6 अ होम असे फलाट आहेत. यापैकी 6 अ आणि 6 अ होम हे फलाट लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वापरले जातात.

बोरीवली स्थानकातील फलाट क्रमांकांची माहिती नसलेल्या प्रवाशांना अनेकदा गाडी पकडताना अडचणी येतात. या अडचणी फलाटांची क्रमवारी सरळ रेषेत आल्यावर सुटणार आहेत. यापूर्वी पश्चिम रेल्वे प्रशासनाने विलेपार्ले, अंधेरी, सांताक्रूझ स्थानकातील फलाट क्रमांक बदलले आहेत.

आधीचे फलाट क्रमांक - 8, 7, 1, 2, 3, 4, 5, 6, 6 A, 6 A होम

नवीन फलाट क्रमांक - 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा