पश्चिम रेल्वेचे 'नो प्लास्टिक' अभियान

  • मुंबई लाइव्ह टीम & अतुल चव्हाण
  • परिवहन

प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू होण्याअाधीच पश्चिम रेल्वेने प्लास्टिकला ना म्हणत प्लास्टिकच्या पर्यायी असलेल्या वस्तुंचा वापर सुरु केला आहे. मुंबईमधून बाहेरगावी जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तसेच प्रवाशांना दिले जाणारे जेवण पॅक करण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यात येत होता. मात्र, यावर आता पश्चिम रेल्वेने पर्यावरणपूरक उपाय केला आहे.

पर्यावरणपूरक पॅकींग बॅगमध्ये जेवण

या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनापासून  पश्चिम रेल्वेकडून पॅकींगसाठी वापरले जाणारे हे डबे पुर्णपणे पर्यावरणाला पूरक (बायो-डिग्रेबल बॅगेज) असे वापरण्यास सुरूवात करण्यात अाली.  पश्चिम रेल्वेच्या तिन्ही राजधानी एक्सप्रेसमधे सध्या प्रायोगीक तत्त्वावर या डब्य़ांचा वापर करण्यात येत अाहे.  वापार झाल्यानंतर या पॅकेजींगला कम्पोस्टिंगच्या माध्यमातून विघटण करणं शक्य होणार असल्यामुळे पर्यावरणाला कुठेही बाधा निर्माण होणार नसल्याचं पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं. तसेच पश्चिम रेल्वेच्या महिला संघटनेकडूनसुद्धा 'नो प्लास्टिक' अभियान राबवत रेल्वेतील महिला कर्मचाऱ्यांना इको फ्रेंडली बॅगांचे वितरण करण्यात आले.


हेही वाचा - 

प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना एसटी देणार संधी

अंधेरीतल्या गर्दीमुळे ३ लोकलचं वेळापत्रक बदलणार


पुढील बातमी
इतर बातम्या