SHARE

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ आणि ९ वर दररोज सकाळी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होते. या गर्दीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने २५ जूनपासून ३ लोकल फेऱ्यांचं वेळापत्रक बदलण्याचं ठरवलं आहे.


'या 'लोकलचं वेळापत्रक बदललं

  • वसई रेल्वे स्थानकावरून सकाळी ७.४३ वाजता सुटणारी लोकल आता सकाळी ७.४० ला सुटणार आहे. त्यानुसार ही लोकल अंधेरी स्थानकात सकाळी ८.३० ऐवजी ८.२१ ला पोहोचेल.
  • अंधेरी रेल्वेस्थानकावरून सकाळी ८.३५ वाजता सुटणारी लोकल सकाळी ८.३० ला सुटणार आहे. ही लोकल विरार स्थानकात सकाळी ९.३१ ऐवजी ९.२२ ला पोहोचेल.
  • चर्चगेट रेल्वे स्थानकावरून सकाळी ८.०० वाजता सुटणारी लोकल सकाळी ८.०४ ला सुटणार आहे. ही लोकल विरार स्थानकात सकाळी ९.२२ ऐवजी ९.३२ ला पोहोचेल.

पश्चिम रेल्वेच्या या बदलामुळे अंधेरी स्थानकात सकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांना होणारा त्रास कमी होण्याची शक्यता आहे.हेही वाचा-

मुंबईतली 'ही' ३ रेल्वे स्थानकं सर्वात अस्वच्छ!

मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर दरड कोसळलीसंबंधित विषय
ताज्या बातम्या