Advertisement

मुंबईतली 'ही' ३ रेल्वे स्थानकं सर्वात अस्वच्छ!

देशभरातील रेल्वेस्थानकांच्या स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वे घेण्यात आला. यामध्ये कानपूर रेल्वे स्थानक देशभरात सर्वात अस्वच्छ ठरले आहे. मात्र, मुंबईकरांसाठी चिंतेची बाब म्हणजे मुंबई आणि उपनगरातील कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे स्टेशन या तीन स्थानकांचाही समावेश या यादीमध्ये करण्यात आला आहे.

मुंबईतली 'ही' ३ रेल्वे स्थानकं सर्वात अस्वच्छ!
SHARES

रेल्वे स्थानकातील स्वच्छता हा प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. याबाबत अनेक संस्थांनी याआधी सर्वेक्षण केले आहे. आता मात्र खुद्द रेल्वे विभागानेच देशभरातल्या रेल्वे स्थानकांचा सर्वे केला आहे. सर्वेच्या निष्कर्षांमध्ये यामध्ये मुंबईतल्या तीन रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे. पण तो चांगल्या कारणासाठी नाही!


कल्याण, ठाणे, एलटीटी अस्वच्छ!

देशभरातील रेल्वेस्थानकांच्या स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वे घेण्यात आला. यामध्ये कानपूर रेल्वे स्थानक देशभरात सर्वात अस्वच्छ ठरले आहे. मात्र, मुंबईकरांसाठी चिंतेची बाब म्हणजे मुंबई आणि उपनगरातील कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे स्टेशन या तीन स्थानकांचाही समावेश या यादीमध्ये करण्यात आला आहे. यादीत कल्याण तिसऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस पाचव्या तर ठाणे सहाव्या स्थानावर आहे.


प्रवासी स्वच्छतेवर असमाधानी

११ मे ते १७ मे दरम्यान हा सर्वे करण्यात आला होता. यामध्ये कल्याण स्थानकावर तब्बल ५८% प्रवाशांनी स्थानकावरील स्वच्छतेबाबत असमाधान व्यक्त केलं आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे स्थानकांवर हेच प्रमाण अनुक्रमे ५५.८९% आणि ५५.७२% इतके आहे.


६ प्रकारच्या सेवांचा केला सर्वे

या सर्वेक्षणादरम्यान स्थानकावरील आणि रेल्वेमधील स्वच्छता, केटरिंग, एसीची स्थिती, जेवणाचा दर्जा, वक्तशीरपणा आणि झोपण्याची व्यवस्था या सहा बाबींवर आधारित हा सर्वे घेण्यात आला. याचा फायदा प्रवाशांना चांगली सुविधा मिळण्याबरोबरच कंत्राटदारावर जबाबदारी निश्चित करण्यासाठीही होईल, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा

पाणी बचतीसाठी 'तेजस एक्स्प्रेस'मधील नळाला सेन्सर


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा