Advertisement

पाणी बचतीसाठी 'तेजस एक्स्प्रेस'मधील नळाला सेन्सर

तेजस एक्स्प्रेसमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सेन्सरयुक्त नळ बसवण्यात आले आहेत. या एक्स्प्रेसमधील पाण्याचा प्रत्येक थेंब वाचावा आणि नैसर्गिक स्त्रोतांची हानी होऊ नये, या उद्देशाने मध्य रेल्वेतर्फे विशेष प्रयत्न केेले जात आहेत.

पाणी बचतीसाठी 'तेजस एक्स्प्रेस'मधील नळाला सेन्सर
SHARES

अत्याधुनिक सोयी सुविधा आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास देणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सेन्सरयुक्त नळ बसवण्यात आले आहेत. या एक्स्प्रेसमधील पाण्याचा प्रत्येक थेंब वाचावा आणि नैसर्गिक स्त्रोतांची हानी होऊ नये, या उद्देशाने मध्य रेल्वेतर्फे विशेष प्रयत्न केेले जात आहेत.


'या' गाड्यांमध्येही सेन्सरयुक्त नळ

तेजस एक्स्प्रेसमध्ये बसवण्यात आलेल्या या सेन्सरयुक्त नळापुढे हात नेल्यानंतरच पाणी येणार असल्यामुळे पाण्याचा गैरवापर होणार नाही. या प्रयोगानंतर इतर मेल आणि एक्स्प्रेसमध्येही सेन्सरयुक्त नळ बसवण्याचा निर्णय मध्ये रेल्वे प्रशासन घेणार आहे.


अत्याधुनिक तेजस

कोकण मार्गावर सीएसएमटी ते करमाळी रेल्वेस्थानकापर्यंत धावणाऱ्या या तेजस एक्सप्रेसमध्ये आरामदायी आसनव्यवस्था, स्वयंचलीत दरवाजे, एलईडी आणि चहा-कॉफी व्हेडिंग मशीन्स अशाप्रकारच्या अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत.



हेही वाचा-

खूशखबर! 2 ऑक्टोबरचा 'नो नॉन व्हेज डे' रद्द



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा