Advertisement

खूशखबर! 2 ऑक्टोबरचा 'नो नॉन व्हेज डे' रद्द


खूशखबर! 2 ऑक्टोबरचा 'नो नॉन व्हेज डे' रद्द
SHARES

गांधी जयंतीला रेल्वे गाड्यांतून प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. कारण 2 ऑक्टोबरला रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मांसाहार जेवण करता येणार आहे.

काही दिवसांपूर्वी 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती हा दिवस 'नो नॉनव्हेज डे' म्हणजेच 'शाकाहार दिवस' म्हणून पाळला जावा, असा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने सरकारला सादर केला होता. मात्र रेल्वेचा हा प्रस्ताव सरकारने रद्द केला आहे.


म्हणून रेल्वेने हा प्रस्ताव सादर केला

माहात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने रेल्वेच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याने काही दिवसांपूर्वी 2 ऑक्टोबर हा दिवस शाकाहार दिवस म्हणून पाळला जावा असं सांगण्यात आलं होतं.
मात्र रेल्वेचा हा प्रस्ताव सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे आता गांधी जयंतीला कुणाच्याही मासाहार करण्यावर रेल्वे प्रतिबंध घालणार नाही. प्रवासी आपल्या आवडीनुसार आपल्या जेवणाची निवड करू शकतात. असा खुलासा रेल्वे बोर्डाकडून करण्यात आला आहे.


हेही वाचा - 

शिवडीतील क्षयरोग रुग्णांना केवळ शाकाहारीच जेवण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा