Coronavirus cases in Maharashtra: 920Mumbai: 526Pune: 101Pimpri Chinchwad: 39Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Ahmednagar: 23Navi Mumbai: 22Thane: 19Nagpur: 17Panvel: 11Aurangabad: 10Vasai-Virar: 8Latur: 8Satara: 5Buldhana: 5Yavatmal: 4Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Nashik: 2Other State Resident in Maharashtra: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Gondia: 1Palghar: 1Washim: 1Amaravati: 1Hingoli: 1Jalna: 1Total Deaths: 52Total Discharged: 66BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

आता २ ऑक्टोबरला 'नो नॉन व्हेज डे'!

रेल्वे मंत्रालयाने तसा एक प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला आहे. यामध्ये २ ऑक्टोबरला रेल्वेसाठी 'शाकाहार दिन' असेल असे नमूद करण्यात आले आहे.

आता २ ऑक्टोबरला 'नो नॉन व्हेज डे'!
SHARE

२ ऑक्टोबर हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जयंती दिवस. या दिवशी देशभरात राष्ट्रीय स्वच्छता दिवस साजरा केला जातो. तसेच या दिवशी 'ड्राय डे'ही असतो. मात्र आता यासोबतच हा दिवस 'नो नॉन व्हेज डे' म्हणजेच 'शाकाहारी दिन' म्हणून पाळला जाण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाने तसा एक प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला आहे. यामध्ये २ ऑक्टोबरला रेल्वेसाठी 'शाकाहार दिन' असेल असे नमूद करण्यात आले आहे.


तीन वर्ष असेल शाकाहार दिन!

यावर्षी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची १५०वी जयंती आहे. याप्रीत्यर्थ हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने तयार केला आहे. या प्रस्तावानुसार २ ऑक्टोबर २०१८, २०१९ आणि २०२० ही तीन वर्ष रेल्वे परिसर आणि रेल्वेमध्येही नॉन व्हेज जेवण मिळणार नाही. त्यामुळे जर केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली, तर या दिवशी रेल्वेमध्ये नॉनव्हेज बंद होणार आहे.जयंती कार्यक्रम आयोजनासाठी समिती

महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्ताने केंद्र सरकारकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून एक समितीही नेमण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला या समितीच्या झालेल्या बैठकीचं अध्यक्षस्थान स्वत: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भूषवलं होतं.


विशेष स्वच्छता एक्स्प्रेस

याशिवाय, साबरमतीला जोडणाऱ्या सर्व स्थानकांसाठी विशेष 'स्वच्छता एक्स्प्रेस'ही त्या दिवसी सोडण्यात येणार आहे. तर १२ मार्च रोजी गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी काढलेल्या दांडी मार्चच्या प्रीत्यर्थ 'स्पेशल सॉल्ट ट्रेन'ही सोडण्यात येणार आहे.


सांस्कृतिक मंत्रालयाच्या परवानगीची प्रतिक्षा

याव्यतिरिक्त, महात्मा गांधींचा वॉटरमार्क असलेली तिकीटंही जारी करण्यात येणार आहेत. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने हा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठवला आहे. सांस्कृतिक मंत्रालयाची अंतिम परवानगी मिळाल्यानंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.हेही वाचा

सीएसएमटी होणार हरीत रेल्वे स्टेशन


संबंधित विषय
संबंधित बातम्या