Advertisement

सीएसएमटी होणार हरीत रेल्वे स्टेशन


सीएसएमटी होणार हरीत रेल्वे स्टेशन
SHARES

मध्य रेल्वेचं मुुख्यालय असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस! अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून हे स्टेशन संपुर्ण हरित ऊर्जा स्टेशन करण्यात आलं आहे. 


हरित उर्जा कंपनीसोबत रेल्वेचा करार

केंद्र सरकराच्या हरित उर्जा कंपनीसोबत मध्य रेल्वेने करार केला आहे. या करारातंर्गत पवन उर्जेद्वारे सीएसएमटी स्टेशन प्रकाशमान होणार आहे.

मध्य रेल्वेवरील सर्व कार्यालयं, विभागांना लागणारी वीज ही हरीत उर्जा प्रकल्पातून पुरवली जाणार आहे. हरित ऊर्जेमुळे सीएसएमटी स्टेशन वर्षाला दीड कोटी रुपयांची वीजेची बचत करणार आहे.


यांचं हरीत उर्जा स्टेशनमध्ये रुपांतर

नेरळ - माथेरान, आसनगांव आणि मानखुर्द या स्टेशनचं हल्लीच हरीत उर्जा स्टेशनमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनही हरीत उर्जा स्टेशन म्हणून ओळखलं जाणार आहे.


सीएसएमटी स्टेशनवर लखलखाट

राज्यातील सांगली येथील पवन ऊर्जा प्रकल्पातून मिळणारी वीज मध्य रेल्वेच्या स्टेशनवर वापरली जाणार आहे. यात मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह, मनमाड, भुसावळ आणि नागपूर स्थानकांचा समावेश आहे. पवन ऊर्जा प्रकल्पातून एकूण १२.९३ लाख युनिट वीज तयार होणार आहे. 

सीएसएमटी स्टेशन येथील विविध कार्यालयं, प्रतिक्षालयं लवकरच पवन ऊर्जेने प्रकाशमान होणार आहे. करारानूसार आगामी २५ वर्षांपर्यंत पवन ऊर्जेद्वारे सीएसएमटी स्टेशनवर लखलखाट होणार आहे. या करारानुसार सीएसएमटी स्टेशन वर्षभरात सुमारे दीड कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा