बुलेट ट्रेन नवी मुंबई विमानतळाशी जोडणार?

देशाची आर्थिक राजधानी मुंबई (mumbai) आणि अहमदाबाद (ahmedabad) ही दोन शहरं बुलेट ट्रेनने जोडली जाणार आहेत.

सुमारे 508 किलोमीटर लांबीच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पामुळे प्रवासाचा कालावधी लक्षणीय कमी होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बुलेट ट्रेन कधी धावतेय याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

या प्रकल्पाबाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनमार्ग (Bullet train) पुढे नवी मुंबई विमानतळाशी जोडली जाणार असल्याची चर्चा आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबई (navi mumbai) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ (NMIA) उभारलं जात आहे. या विमानतळाचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या विमानतळापर्यंत जाण्यासाठी सर्व प्रकारची कनेक्टिव्ही वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या कनेक्टिव्हिटीमध्ये बुलेट ट्रेनचीही भर पडण्याची शक्यता आहे. यासंदर्भातला प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सादर झालेल्या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रेल्वे बोर्ड याबाबत काय निर्णय घेणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पायाभूत सुविधा देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारकडून केलं जात आहे. विमानतळापर्यंत मेट्रोमार्गाला अगोदरच मान्यता मिळाली आहे. त्यापाठोपाठ आता बुलेट ट्रेनही तिथे पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


हेही वाचा

उत्तनसह अन्य 6 गावांचा विकास आराखडा प्रसिद्ध

महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागी 'मुंबई सेंट्रल पार्क' उभारणार

पुढील बातमी
इतर बातम्या