वांद्रेवरून जम्मूसाठी धावणार स्पेशल ट्रेन, 'अशी' करा बुकिंग

(File Image)
(File Image)

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासाची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून, पश्चिम रेल्वे (WR) वांद्रे टर्मिनस आणि जम्मू तवी दरम्यान विशेष भाड्यावर साप्ताहिक एसी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, विशेष ट्रेनचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

ट्रेन क्रमांक ०९०९७/०९०९८ वांद्रे टर्मिनस - जम्मू तवी (साप्ताहिक) सुपरफास्ट स्पेशल [१८ फेऱ्या]

ट्रेन क्रमांक 09097 वांद्रे टर्मिनस - जम्मू तवी एसी सुपरफास्ट स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर रविवारी 21.50 वाजता सुटेल आणि मंगळवारी 08.40 वाजता जम्मू तवीला पोहोचेल. ही ट्रेन 17 एप्रिल 2022 ते 12 जून 2022 पर्यंत धावेल.

त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 09098 जम्मू तवी - वांद्रे टर्मिनस एसी सुपरफास्ट स्पेशल जम्मू तावी येथून दर मंगळवारी 23.20 वाजता सुटेल आणि गुरुवारी 10.10 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल.

ही ट्रेन 19 एप्रिल 2022 ते 14 जून 2022 पर्यंत धावेल. ही ट्रेन बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, गंगापूर सिटी, मथुरा जंक्शन, दिल्ली सफदरजंग, अंबाला कॅंट, लुधियाना इथं थांबेल. या ट्रेनमध्ये AC 3-टायर आणि AC चेअर कार कोच आहेत.

ट्रेन क्रमांक 09097 चे बुकिंग 13 एप्रिल 2022 पासून PRS काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल. वरील ट्रेन पूर्णपणे आरक्षित ट्रेन म्हणून धावेल.

थांबण्याच्या वेळा आणि रचना यासंबंधी तपशीलवार माहितीसाठी, प्रवासी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकतात. विशेष ट्रेनमध्ये फक्त कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच बसण्याची परवानगी दिली जाईल.


हेही वाचा

रिंग रूट्सवर धावणाऱ्या सर्व बसेसमध्ये कार्ड रीडर बसवण्यात येणार

कोकण रेल्वेचा प्रवास होणार सुकर, १० नवीन क्रॉसिंग स्थानकं...

पुढील बातमी
इतर बातम्या