बेस्ट बसबाबत माहिती देणारं अॅप तयार

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता लवकरचं बसचं नेमकं ठिकाणं कुठं आहे हे समजण्यात मदत होणार आहे. कारण बेस्टचं बसबाबत माहिती देणारं अॅप तयार झालं असून ते कधीही लॉंच होण्याची शक्यता आहे. याबाबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. 

आयटीएमएस प्रकल्पाचा भाग

बेस्टचं हे अॅप 'इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम' (आयटीएमएस) या प्रकल्पाचा एक भाग असून, या प्रकल्पाची किंमत ११२ कोटी रुपये आहे. दरम्यान, या अॅपसंदर्भात 'एसी बस लवकरच येणार आहेत. एसी बस आणि अधिक इलेक्ट्रिक बस यामुळं प्रवास सुखकर होणार आहे. तसंच, बेस्टचं अ‍ॅपही बनविलं जातं आहे', असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. 

अनेक पर्याय उपलब्ध 

बेस्टच्या या अॅपमध्ये अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. अॅपमध्ये आपलं ठिकाण टाकल्यास या आपच्या मध्यमातून बस थांब्याची माहिती देण्यात येणार आहे. तसंच, बस मार्गही समजण्यातही मदत होणार आहे. बसचं ठिकाण समजणार आहे. एखादी बस आगारातून किती वाजता निघणार आणि किती वाजता पोहोचणार यासंदर्भात माहिती मिळणार आहे. या अॅपमध्ये जीपीएस प्रणाली असल्यानं वाहतुकीची सध्यस्थिती समजेल. यांसारखे अनेक पर्याय या अॅपमध्ये आहेत. 


हेही वाचा -

रस्त्यांवरील खड्डे भरणं बेकायदेशीर- महापालिका

'या' मागण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा


पुढील बातमी
इतर बातम्या