Advertisement

'हा' सिनेमा पाहून हिरानींना आठवले जुने दिवस


'हा' सिनेमा पाहून हिरानींना आठवले जुने दिवस
SHARES

काही सिनेमे फिल्ममेकर्सनाही जुन्या क्षणांची आठवण करून देतात. हिंदी सिनेसृष्टीतील अग्रगण्य दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या राजकुमार हिरानींनाही ‘छिछोरे’ पाहिल्यावर जुने दिवस आठवले.

स्तुती सुमनांची उधळण

‘छिछोरे’ या सिनेमानं रसिक आणि समीक्षकांपासून बाॅलीवूडकरांचीही मनं जिकण्यात यश मिळवलं आहे. बाॅलीवूडकरांच्या या यादीत दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे नाव लक्ष वेधून घेत आहे. काॅलेज ड्रामा असलेल्या या सिनेमावर हिरानींनी स्तुती सुमनांची उधळण केली आहे. अलिकडेच ‘छिछोरे’ पाहण्याचा योग जुळून आल्यानंतर त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, ‘छिछोरे’ हा सिनेमा सर्व आई-वडिलांसाठी महत्त्वपूर्ण आहे. यासोबतच हा सिनेमा भूतकाळातील सोनेरी क्षणांना उजाळा देणारा आहे. ‘छिछोरे’ हा सिनेमा नॉस्टेल्जिया क्षणांनी सजलेला असून, एक महत्त्वपूर्ण संदेश देणारा आहे.

१०० कोटींचा व्यवसाय

याखेरीज हिरानी म्हणाले की, जर तुम्ही कधी होस्टेलमध्ये राहिला असाल, तर नक्कीच स्वत:ला या सिनेमाशी रिलेट कराल. या सिनेमात तुम्हाला तुमचे मित्र दिसतील आणि तुम्ही त्यातील धमाल-मस्तीचा आनंदही उपभोगाल. जीवन हे जय आणि पराजयाच्या पलीकडं असल्याचा संदेश देणारा ‘छिछोरे’ सर्व आई-वडिलांनी पहायला हवा असंही हिरानी यांनी आर्वजून सांगितलं आहे. या सिनेमानं आतापर्यंत १०० कोटींचा व्यवसाय केला आहे.



हेही वाचा -

राजकुमार आणि मौनी रॉयच्या 'मेड इन चायना'चा ट्रेलर प्रदर्शित

सोनालीचा डॅशिंग अंदाज पाहिला का?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा