राजकुमार आणि मौनी रॉयच्या 'मेड इन चायना'चा ट्रेलर प्रदर्शित

'मेड इन चायना' चित्रपटात राजकुमार राव आणि मौनी रॉय यांच्याव्यतिरिक्त बोमन ईरानी, परेश रावल, सुमित व्यास आणि गजराज राव हे कलाकार देखील आहेत.

  • राजकुमार आणि मौनी रॉयच्या 'मेड इन चायना'चा ट्रेलर प्रदर्शित
SHARE

अभिनेता राजकुमार राव आणि मौनी रॉय यांचा चित्रपट 'मेड इन चायना' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरत आहे. चित्रपटात राजकुमार राव आणि मौनी रॉय यांच्याव्यतिरिक्त बोमन ईरानी, परेश रावल, सुमित व्यास आणि गजराज राव हे कलाकार देखील आहेत.


'मेड इन चायना' हा विनोदीपट असून यात राजकुमार राव गुजराती व्यावसायिकाची व्यक्तीरेखा साकारत आहे. छोटे-मोठे उद्योग करणारा रघु मेहता हा काही ना काही वगेळं आणि नवीन व्यवसाय करण्याच्या प्रयत्नात असतो. व्यवसायात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तो चीनला जातो. तिकडे त्याला गुप्तरोगांवर उपचार करणारं एक प्रोडक्ट मिळतं. हे प्रोडक्ट तो भारतात येऊन विकत असतो. त्याच्या या संपूर्ण प्रवासात नेमकं काय घडतं आणि त्याचा हा व्यवसाय किती यशस्वी होतो हे या चित्रपटात पाहता येईल.


चित्रपटात मौनी रॉयनं राजकुमार रावच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर बोमण इराणीनं सेक्सोलॉजिस्टची व्यक्तिरेखा साकारली आहे. मौनी आणि राजकुमार ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहे. यापूर्वी मौनीनं अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात देखील मौनीनं अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारली होती.हेही वाचा

अमिताभसोबत विक्रम गोखले आणि नीना कुलकर्णी

सोनालीचा डॅशिंग अंदाज पाहिला का?
संबंधित विषय
ताज्या बातम्या