Advertisement

अमिताभसोबत विक्रम गोखले आणि नीना कुलकर्णी

ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी आजवर बऱ्याच आॅनस्क्रीन व्यक्तिरेखा सजीव करत प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. नीना यांनी आतापर्यंत साकारलेल्या अनेक भूमिका या अनेकांना आवडल्या अन् भावल्या देखील.

अमिताभसोबत विक्रम गोखले आणि नीना कुलकर्णी
SHARES

मराठी सिनेसृष्टीपासून हिंदीपर्यंत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारे दोन मराठमोळे कलाकार अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहेत. 'AB आणि CD' या आगामी मराठी सिनेमामध्ये विक्रम गोखलेंसोबत नीना कुलकर्णी यांनीही अमिताभ यांच्या बरोबरीनं महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी आजवर बऱ्याच आॅनस्क्रीन व्यक्तिरेखा सजीव करत प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. नीना यांनी आतापर्यंत साकारलेल्या अनेक भूमिका या अनेकांना आवडल्या अन् भावल्या देखील. ‘आसू’ आणि ‘हसू’ या दोन्ही गोष्टी त्यांनी आपल्या अभिनयातून अगदी सहजपणं प्रेक्षकांपर्यंत पोहचवल्या अहसंत. अभिनेत्री या नात्याने ते प्रेक्षकवर्गापर्यंत पोहचल्या जरुर, पण आता सोशल मिडीयाच्या माध्यमातून देखील त्यांनी एक सरप्राईज प्रेक्षकांना दिलं आहे.

नीना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यावरुन हे नक्कीच लक्षात येतं की ‘AB आणि CD’ या सिनेमात त्यांची सरप्राईज एण्ट्री झाली आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत, पण नीनासुद्धा महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत हे अनेकांसाठी नक्कीच सरप्राईज असेल. त्या या सिनेमात कोणती भूमिका साकारणार आहेत? त्यांच्या सरप्राईज एण्ट्री मागील नेमकं कारण काय? यांची उत्तरं अजूनही गुलदस्त्यात आहेत.

अमिताभ आणि विक्रम गोखले यांनी यापूर्वी बऱ्याचइन्स्टाग्राम सिनेमांमध्ये एकत्र अभिनय केला आहे. यापैकी ‘खुदा गवाह’ आणि ‘अग्निपथ’मधील त्यांचे ऋणानुबंध आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. आता ‘AB आणि CD’ या सिनेमाच्या निमित्तानं ते प्रथमच मराठीत एकत्र झळकणार आहेत. त्यासोबतच नीना यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका यात आहे. अक्षय बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी निर्मित आणि गोल्डन रेशो फिल्म्स, केव्हीआर प्रॉडक्शन्स आणि क्रिष्णा प्रसाद प्रस्तुत ‘AB आणि CD’चं दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केलं आहे.हेही वाचा  -

स्वराज्यातील गुप्तहेर नऊ रूपांमध्ये देणार ‘फत्तेशिकस्त’

कंगनानंतर ही अभिनेत्री बनली 'झाशीची राणी'
संबंधित विषय
Advertisement