Advertisement

स्वराज्यातील गुप्तहेर ९ रूपांमध्ये देणार ‘फत्तेशिकस्त’

गुप्तहेर खात्याची संकल्पना आजची नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. स्वराज्यातील गुप्तहेर म्हणून ख्याती असलेल्या बहिर्जी नाईकांच्या भूमिकेत हरीश दुधाडे शत्रूंना ‘फत्तेशिकस्त’ देणार आहे.

स्वराज्यातील गुप्तहेर ९ रूपांमध्ये देणार ‘फत्तेशिकस्त’
SHARES

देशावर येणाऱ्या संकटांबाबत सतर्क करण्याची गुप्तहेर खात्यावर असते. गुप्तहेर खात्याची संकल्पना आजची नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. स्वराज्यातील गुप्तहेर म्हणून ख्याती असलेल्या बहिर्जी नाईकांच्या भूमिकेत हरीश दुधाडे शत्रूंना ‘फत्तेशिकस्त’ देणार आहे.

छत्रपती शिवरायांचं गुप्तहेर खातं अतिशय कार्यक्षम होतं आणि या गुप्तहेर खात्याचा कणा होते त्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. मराठा इतिहासातील हा महानायकच! आणि भारतातील गुप्तहेर संस्थेचे जनकच! बेमालूम वेशांतर करण्याचं कसब, भाषाचातुर्य, युद्धनीती, कुटनीती आणि दुर्दम्य आत्मविश्वास असलेल्या बहिर्जींच्या अफाट कामगिरीच्या मदतीनं स्वराज्याच्या असंख्य मोहिमा सफल झाल्या. याच बहिर्जी नाईक यांची दमदार भूमिका अभिनेता हरिश दुधाडे आगामी ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात साकारणार आहे. १५ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र झळकणार आहे.

रंगभूमी आणि छोटा पडदा गाजवणाऱ्या हरिशनं आजवर विविधांगी भूमिका साकारत रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता मोठ्या पडद्यावर हरिश वेगवेगळ्या रुपात दिसणार आहे. हरीश यांच्या बहुरूपी भूमिका हे चित्रपटाचं खास वैशिष्टय़ ठरणार असून, चित्रपटात अघोरी, कव्वाल, पोतराज यासारख्या नऊ विविध भूमिका हरीश यांनी आपल्या खास शैलीत साकारून चित्रपटाची रंगत वाढवली आहे. या भूमिकेबद्दल हरीश म्हणाला की, बहिर्जी नाईक यांची भूमिका करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. कोणत्याही कलाकारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला मिळणं हे एक आव्हान असतं आणि कलाकारालाही ते आव्हान स्वीकारायला आवडतं. मला ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात तशी संधी मिळाली ही नक्कीच आनंदाची बाब आहे.

यापूर्वी ‘फर्जंद’ सिनेमाच्या माध्यमातून कोंडाजी फर्जंद यांची शौर्यगाथा मांडणाऱ्या दिग्पाल लांजेकरनं या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन केलं आहे. छायांकन रेशमी सरकार तर संकलन प्रमोद कहार यांचं आहे. संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी, तर गीतं संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, वि. स. खांडेकर, दिग्पाल लांजेकर यांनी लिहीली आहेत. वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असून, रंगभूषा सानिका गाडगीळ यांची आहे.



हेही वाचा -

कंगनानंतर ही अभिनेत्री बनली 'झाशीची राणी'

या मराठी कार्यक्रमावर परदेशातही झाला कौतुकाचा वर्षाव




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा