Coronavirus cases in Maharashtra: 441Mumbai: 235Pune: 48Islampur Sangli: 25Ahmednagar: 17Nagpur: 16Pimpri Chinchwad: 15Thane: 14Kalyan-Dombivali: 9Navi Mumbai: 8Vasai-Virar: 6Buldhana: 6Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 19Total Discharged: 42BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

या मराठी कार्यक्रमावर परदेशातही झाला कौतुकाचा वर्षाव

मराठी नाटक आणि कार्यक्रमांनी कायमच देश-विदेशातील नाट्यप्रेमींवर मोहिनी घातली आहे. आता अभिनेते विजय कदम यांच्या 'खुमखुमी' या बहुचर्चित कार्यक्रमानं या देशातील लोकांवर जणू जादूच केली आहे.

या मराठी कार्यक्रमावर परदेशातही झाला कौतुकाचा वर्षाव
SHARE

मराठी नाटक आणि कार्यक्रमांनी कायमच देश-विदेशातील नाट्यप्रेमींवर मोहिनी घातली आहे. आता अभिनेते विजय कदम यांच्या 'खुमखुमी' या बहुचर्चित कार्यक्रमानं या देशातील लोकांवर जणू जादूच केली आहे.

विजय कदमांचा उल्लेख होताच त्यांच्या 'खुमखुमी' या गाजलेल्या कार्यक्रमाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. याच कार्यक्रमानं मागील काही वर्षांपासून परदेशातील मराठमोळ्या बांधवांना वेड लावलं आहे. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या मानाच्या गणपतीच्या शताब्दी वर्षाचं औचित्य साधत विजय कदम यांनी समस्त लंडनवासियांसोबत आपल्या 'खुमखुमी' कार्यक्रमाचं दमदार सादरीकरण केलं. या सादरीकरणासाठी लंडनमधील स्थानिक सहकलाकार आणि नृत्यांगना यांचं बहुमोल सहकार्य लाभलं. या सर्वांच्या साथीमुळं लंडनमधील 'खुमखुमी' चांगलीच गाजली.

विजय कदमांची 'खुमखुमी' पाहिल्यावर सर्व रसिकांनी कार्यक्रमाला भरभरून दाद दिली. कदमांच्या विशेष शैलीसोबत इतर कलाकारांच्या अभिनयाचंही कौतुक केलं. सौ. ओजस्वी केतकर भिडे, सौ. केतकी भट रानडे, सौ. रूपाली कवडे जगताप, सौ. जयश्री माळवे या नृत्यांगनांनी दिमाखदार लावण्या सादर करीत रसिकांची दाद मिळवली. कौस्तुभ वैद्य, निखिल कोरान्ने, विपुल गांगुर्डे या सहकलाकारांनी व्यावसायिक कलाकारांच्या तोडीची 'खुमखुमी'तील प्रहसनं सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं. हार्मोनियम वादक सौ. स्वानंद नेवसे आणि ढोलकी तबल्यावर ज्ञानेश दाऊदखुणे यांनी 'खुमखुमी' सुरात अन् तालबद्द रंगवली.

महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाप्रमाणंच स्लॅाग मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमही चांगलाच रंगला. या कार्यक्रमाची सांगता विजय कदम यांनी सादर केलेल्या भैरवीनं झाली. मंडळाच्या वतीनं सचिन नेमाणे आणि अजय मुरूडकर बंधू यांनी आदरतिथ्य करत संपूर्ण कार्यक्रमासाठी उत्तम सहकार्य केलं. हा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे 'हेचि दान देगा देवा' अशा शब्दांत कदम यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करत लंडनमधील स्थानिक कलाकारांचं आभार मानले.हेही वाचा -

‘पांडू’ उलगडणार पोलिसांचं अंतरंग

एमएक्स प्लेयरवर मोफत पहा या मराठी वेब सिरीज
संबंधित विषय
ताज्या बातम्या