Advertisement

सोनालीचा डॅशिंग अंदाज पाहिला का?

‘नटरंग’मध्ये अप्सरा बनून मराठमोळ्या रसिकांवर मोहिनी घातल्यानंतर ‘ग्रँड मस्ती’ करत हिंदीत दाखल झालेली सोनाली कुलकर्णी आता डॅशिंग स्टाईलमध्ये दिसणार आहे.

सोनालीचा डॅशिंग अंदाज पाहिला का?
SHARES
Advertisement

‘नटरंग’मध्ये अप्सरा बनून मराठमोळ्या रसिकांवर मोहिनी घातल्यानंतर ‘ग्रँड मस्ती’ करत हिंदीत दाखल झालेली सोनाली कुलकर्णी आता डॅशिंग स्टाईलमध्ये दिसणार आहे.

‘बकुळा नामदेव घोटाळे’ या सिनेमात बकुळा बनून लक्ष वेधणाऱ्या सोनालीनं नेहमीच विविधांगी भूमिकांना प्राधान्य दिलं आहे. ‘नटरंग’मध्ये नयना कोल्हापूरकरीण या तमासगिरीणीची भूमिका साकारल्यानंतर त्याच बाजाच्या व्यक्तिरेखांमध्ये अडकून न राहता तिनं भूमिकांमधील आव्हान स्वीकारत स्वत:ला सिद्ध केलं. त्यामुळंच दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढच होत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ती अँड ती’ या सिनेमातही तिचं वेगळं रूप समोर आलं होतं. आता ‘विक्की वेलिंगकर’ या आगामी सिनेमात धडाकेबाज सोनालीचं दर्शन घडणार आहे.

‘विक्की वेलिंगकर’ या आगामी मराठी सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमात ‘वेळेचं महत्त्व वेळ गेल्यावरच कळतं…’ ही या सिनेमाच्या टायटलसोबतची टॅगलाईन वेळेचं महत्त्व अधोरेखित करणारी आहे. जीन्स-टँक टाॅप आणि हातात घड्याळ घातलेली सोनालीची अदा या पोस्टरवर आहे. या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केलं आहे. अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार यांनी प्रणय चोकसी आणि डान्सिंग शिवाच्या सहयोगानं या सिनेमाची प्रस्तुती केली आहे. जसीम्स, लोकिज स्टुडिओ आणि डान्सिंग शिवा या बॅनरखाली ‘विक्की वेलिंगकर’ची निर्मिती करण्यात आली आहे. ६ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहतेतिची ही कथा आहेहेही वाचा  -

स्वराज्यातील गुप्तहेर नऊ रूपांमध्ये देणार ‘फत्तेशिकस्त’

कंगनानंतर ही अभिनेत्री बनली 'झाशीची राणी'
संबंधित विषय
Advertisement