Advertisement

शक्तीकांत दास आरबीआयचे नवे गर्व्हनर

शक्तीकांत दास यांची आरबीआयचे २५ वे गर्व्हनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दास ३ वर्षांसाठी या पदावर राहतील. दास याआधी अर्थमंत्रालयाचे सचिव होते.

शक्तीकांत दास आरबीआयचे नवे गर्व्हनर
SHARES

उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर रिझर्व्ह बँके (RBI)ला अखेर गर्व्हनर मिळाला आहे. आर्थिक मंडळाचे सदस्य असलेले शक्तीकांत दास यांची आरबीआयचे २५ वे गर्व्हनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दास ३ वर्षांसाठी या पदावर राहतील. दास याआधी अर्थमंत्रालयाचे सचिव होते. यापदावर ते २०१५ ते २०१७ पर्यंत कार्यरत होते. गेल्याच वर्षी ते या पदावरून निवृत्त झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.


महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

नवी दिल्लीतील स्टिफन काॅलेजातून मास्टर्स डिग्री घेणाऱ्या दास यांनी भारत सरकारसाठी अर्थ मंत्रालय आणि डिपार्टमेंट आॅफ एक्सपेंडिचरचे जाॅईंट सेक्रेटरी, तामिळनाडू सरकारचे विशेष आयुक्त आणि महसूल आयुक्त, इंडस्ट्री डिपार्टमेंटचे सेक्रेटरी अशा प्रमुख जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांना जी-२० शिखर संमेलनात भारताचं प्रतिनिधित्व देखील केलं आहे.


नोटाबंदीचे समर्थक

शक्तीकांत दास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वात धाडसी निर्णय नोटाबंदीच्या निर्णयाचे मोठे समर्थक मानले जातात. अर्थ सचिव पदावर असताना त्यांनी नोटाबंदीची व्यूहरचना आखण्यात मदत केली होती. एवढंच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रेडिट संस्थांनी भारताला कमी अंक दिल्यावर दास यांनी तीव्र विरोध करून या संस्थावर सुधारित आकडेवारी जारी करण्यासाठी दबाव टाकला होता.

रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेसोबतच निधी पुरवठ्यावरून केंद्र सरकारसोबत झालेल्या मतभेदानंतर सोमवारी उर्जित पटेल यांनी गर्व्हनर पदाचा राजीनामा दिला होता. दास यांची या पदी निवड झाल्यानंतर आता लवकरच ते या पदाची सूत्रे हाती घेतील.



हेही वाचा-

निकालांचा इफेक्ट: शेअर बाजार ३५० अंकांनी गडगडला

अारबीअायचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा