Advertisement

अारबीअायचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

१९ नोव्हेंबरला अारबीअायच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही विवादास्पद मुद्यांवर सहमती झाली होती. त्यानंतर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याबाबत शंका दूर झाली होती. मात्र, सोमवारी अचानक त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली.

अारबीअायचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
SHARES

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सोमवारी अचानक अापल्या राजीनामा दिला. केंद्र सरकार अाणि अारबीअाय यांच्यामध्ये चालू असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर पटेल यांच्या राजीनाम्याने चर्चांना उधान अालं अाहे. मात्र, अापण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं पटेल यांनी स्पष्ट केलं अाहे. 


केंद्राशी वाद

मागील अनेक दिवसांपासून केंद्र सरकार अाणि अारबीअायमध्ये काही मुद्यांवर वाद चालू होता. सरकारने अारबीअाय कायद्यातील कलम ७ चा वापर केला होता. त्यामुळे अापल्या स्वायत्तेला धोका पोहचण्याची भिती व्यक्त करून अारबीअायने सरकारला विरोध केला होता. मात्र, त्यानंतर वाद मिटला होता. १९ नोव्हेंबरला अारबीअायच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही विवादास्पद मुद्यांवर सहमती झाली होती. त्यानंतर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याबाबत शंका दूर झाली होती. मात्र, सोमवारी अचानक त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. 


९ महिने अाधीच राजीनामा

४ सप्टेंबर २०१६ ला उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यभार स्विकारला होता. त्यांचा कार्यकाल सप्टेंबर २०१९ पर्यंत होता. मात्र, ९ महिने अाधीच त्यांनी राजीनामा दिला. मी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत अाहे. अारबीअायमध्ये काम करणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब अाहे. मी अारबीअायमधील माझ्या सर्व सहकाऱ्यांचं अाणि संचालक मंडळाचे अाभार मानतो, असं पटेल यांनी म्हटलं अाहे. हेही वाचा - 

खूशखबर! नव्या आर्थिक वर्षात घटणार व्याजदर, आरबीआयचे निर्देश
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा