Advertisement

नारायण मूर्ती जेव्हा रतन टाटांच्या पाया पडतात...

टाटा समूहाचे (Tata group) माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) आणि इन्फोसिस (Infosys) चे सहसंस्थापक नारायण मूर्ती (Narayan murti) ही भारतीय उद्योग क्षेत्रातील दोन मोठी नावं आहेत. मात्र या दोघांनी आपले पाय जमिनीवरच असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

नारायण मूर्ती जेव्हा रतन टाटांच्या पाया पडतात...
SHARES

टाटा समूहाचे (Tata group) माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) आणि इन्फोसिस (Infosys) चे सहसंस्थापक नारायण मूर्ती (Narayan murti) ही भारतीय उद्योग क्षेत्रातील दोन मोठी नावं आहेत. मात्र या दोघांनी आपले पाय जमिनीवरच असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. मुंबईत झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात नारायण मूर्ती यांनी चक्क रतन टाटा यांचे चरणस्पर्श करून आर्शिवाद घेतला. 

मुंबईत मंगळवारी 'टायकॉन २०२०' (Tycoon 20) परिषद आयोजीत करण्यात आली होती. यावेळी उद्योजकांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी रतन टाटा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार नारायण मूर्ती (Narayan murti) यांच्या हस्ते रतन टाटा (Ratan Tata) यांना देण्यात दिला. पुरस्कार दिल्यानंतर मूर्ती यांनी क्षणात खाली वाकून टाटा यांच्या चरणांना स्पर्श केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. 

रतन टाटा (Ratan Tata) यांचं वय ८२ वर्षे तर नारायण मूर्ती (Narayan murti) यांचं वय ७२ वर्ष. दोघांच्या वयामध्ये दहा वर्षांचे अंतर असले तरीही कमी वयाच्या उद्योगपतीकडून मोठ्या उद्योगपतीला असा पुरस्कार देण्यात आल्याची घटना तशी विरळच. पण मूर्ती यांनी पुरस्कार दिल्यानंतर लगेचच खाली वाकत टाटांच्या पाया पडत आशिर्वाद घेतले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 


हेही वाचा -

SBI चा ग्राहकांना अलर्ट, या' कारणामुळं खातं होणार फ्रीझ

अर्थसंकल्पात मिळणार करदात्यांना दिलासा?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा