Advertisement

मुंबईतील 18 वर्षीय तरूणाच्या कंपनीत रतन टाटा भागीदार

टाटा ग्रृपचे चेअरमन रतन टाटा मुंबईतील एका 18 वर्षीय तरुणाच्या औषध कंपनीत 50 टक्के भागीदार झाले आहेत.

मुंबईतील 18 वर्षीय तरूणाच्या कंपनीत रतन टाटा भागीदार
SHARES

टाटा ग्रृपचे चेअरमन रतन टाटा मुंबईतील एका 18 वर्षीय तरुणाच्या औषध कंपनीत भागीदार झाले आहेत. 'जेनरिक आधार' असं या कंपनीचे नाव असून या कंपनीत रतन टाटा यांनी 50 टक्के भागीदारी खरेदी केली आहे.

जेनरिक आधार ही औषध कंपनी अर्जुन देशपांडे या तरूणाने सुरू केली आहे. जेनरिक आधारमध्ये औषधे स्वस्त दरात विकली जातात. रतन टाटा कंपनीत भागीदार झाल्याचं अर्जुनने सांगितलं आहे. मात्र, या कराराबाबत किंमतीबाबत मात्र काही माहिती त्याने दिली नाही. 3 ते 4 महिन्यांपूर्वी त्याने टाटांना याबद्दल सांगितले होते. रतन टाटांनी अर्जुनच्या कल्पनेमध्ये उत्सुकता दाखवली आणि त्यांना देखील त्याचा मेंटर बनून काम करावेसे वाटले. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. 

जेनरिक आधारकडून वार्षिक 6 कोटींची विक्री होते. अर्जुन देशपांडेने त्याची कंपनी सुरू करताना यूनीक फार्मेसी एग्रीगेटर बिजनेस मॉडेल स्वीकारले आहे. यामध्ये थेट उत्पादकांकडून औषधांची खरेदी करून त्याची विक्री किरकोळ दुकानदारांना केली जाते.  टाटांच्या भागीदारीमुळे कंपनीच्या विस्तारासाठी मोठा फायदा होणार आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरु आणि ओडिशामधील जवळपास 30 रिटेलर्स या कंपनीशी जोडले गेले आहेत.

या कंपनीमध्ये एकूण 55 कर्मचारी असून त्यामध्ये फार्मासिस्ट, आयटी इंजीनिअर आणि मार्केटिंग प्रोफेशनल्स आहेत. एका वर्षामध्ये जेनरिक आधारच्या 1000 फ्रँचायझी सुरू करण्याचा मानस आहे. या कंपनीचा विस्तार महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि दिल्लीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती अर्जुन देशपांडेने दिली.



हेही वाचा -

Maharashtra Breaking | 531 रक्षकच कोरोनाच्या विळख्यात...

१० जूनपर्यंत १०वी व १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होणार?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा