Advertisement

१० जूनपर्यंत १०वी व १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होणार?


१० जूनपर्यंत १०वी व १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होणार?
SHARES

लॉकडाऊनमुळं अनेक सुविधा झाल्या असून, शाळा व कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षही वाया जाण्याची शक्यता आहे. मात्र एकिकडं १०वी व १२वीच्या परीक्षा झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. असं असलं तरी आता लवकरच १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारनं १०वी व १२वीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रीकांचं मुल्यांकन करण्याबाबत संख्येत दिले असून, मुंबई उच्च न्यायालयानं देखील संबंधित विभागाला १० जूनपर्यंत १०वी व १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

१०वी व १२वीच्या उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठी शिक्षकांना परवानगी देण्याची मागणी विभागाने केली आहे. लॉकाडाऊन काहीसा शिथिल केल्यानंतर आता या उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी विभागानं पाऊल उचलले आहे. उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठी शिक्षकांना प्रवासाची परवानगी देण्याची विनंती शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी सर्व महापालिका आयुक्तांना केली आहे.

परीक्षा झाल्या असल्या तरी निकाला बाकी आहे. त्याचप्रमाणं निकालाकरीता उत्तरपत्रिकांचं मुल्यांकन होणं गरजेचं आहे. परंतु, ते अद्याप झालेलं नाही. त्यामुळं १०वीच्या पेपरच्या मुल्यांकनासाठी एका शिक्षकाला एक क्लासरूम अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबई लाइव्हला दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा