Maharashtra Breaking | 531 रक्षकच कोरोनाच्या विळख्यात...


Maharashtra Breaking | 531 रक्षकच  कोरोनाच्या विळख्यात...
SHARES
देशात कोरोनाचा थैमान दिवसेंदिवस वाढत असताना, याच कोरोनापासून नागरिकांना वाचवण्यासाठी 24 तास झटणाऱ्या पोलिसांना माञ या संसर्गाने विळखा घालण्यास सुरूवात केली आहे. काल पर्यंत पोलिस दलात 422 जणांना कोरोना झाला होता. माञ अवघ्या काही तासाच हा आकडा 531 वर पोहचल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यभरात   पोलिसांना(51 अधिकारी व  480 कर्मचारी) कोरानाची लागण झाली आहे. त्यातील 65 टक्के पोलिस एकट्या मुंबईतील आहे.



कोरोनाच्या नवनवीन रुग्ण समोर येत असतानाच, बुधवारी जे.जे. पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या 26 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. या 26 जणांच्या संपर्कात असलेल्या 49 कर्मचाऱ्यांना ही क्वारन्टाइन केले आहे. तर मुंबईतील बोरोना बाधित 49  पोलिस उपचार घेऊन घरी परतले असून सध्या मुंबईतील 293 पोलिसांवर कोरोनावर उपचार घेत आहेत. तर सोलापूरमध्ये एका पोलिस उपायुक्ताचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील इतर पोलिस कोरोना बाधित रुग्णांच्या तुलनेत मुंबई पोलिसांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे बोलले जाते. त्यामुळे राज्यातील एकूण 639 पोलिसांना क्वारन्टाइन करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी नुकतीच पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कोविड हेल्पलाईन सुरू केली आहे. सध्या मुंबईत 150कोरोनाग्रस्त पोलिस उपचार घेत आहेत.



पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू 

मुंबई पोलीस दल - वाकोला पोलीस स्टेशनमधील हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर

मुंबई पोलीस दल - हेड कॉन्स्टेबल संदीप सुर्वे

मुंबई पोलीस दल - कुर्ला वाहतूक विभाग, पोलीस नाईक शिवाजी नारायण सोनावणे

पुणे पोलीस दल - फरासखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोपट लोंढे

सोलापूर पोलीस दल - एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजुद्दीन रहिमान शेख

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा