Advertisement

अदानीच्या वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक

मे पासून प्रतीयुनिट विजेचा दर एक-दीड रुपयांनी वाढणार आहे.

अदानीच्या वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक
SHARES

अदानी इलेक्ट्रिसिटीने जुलै- डिसेंबर 2023 या कालावधीत केलेल्या वीज खरेदीवर झालेला अतिरिक्त खर्च इंधन समायोजन आकाराच्या माध्यमातून वसूल करण्यास वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे उपनगरातील वीज ग्राहकांच्या प्रतिनयुनिट विजेच्या दरात 70 पैशांपासून 1.70 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. सदरची वाढ 1 मे ते ऑगस्ट अखेरपर्यंत लागू असणार आहे.

वीज निर्मिती करताना वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या दरात वाढ झाल्यास त्याची वसुली इंधन समायोजन आकाराच्या (एफएसी) माध्यमातून वसूल केली जाते. जुलै ते डिसेंबर या कालावधीत इंधनावर झालेला सुमारे 300 कोटी रुपयांचा खर्च वसूल करण्यास मंजुरी देण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीने आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्याला मंजुरी दिली आहे.

घरगुती वीज ग्राहकांना याचा मोठा बसणार आहे. ज्या ग्राहकांचा वीज वापर 0-100 युनिट आहे त्यांच्या प्रतीयुनिट वीज दरात 70 पैशांची वाढ होईल, तर 101-300 युनिट वापर असलेल्या ग्राहकांच्या वीज दरात 1.10 रुपये, 301-500 साठी 1.50 रुपये तर त्यापेक्षा जास्त वापर असलेल्या ग्राहकांच्या प्रतीयुनिट वीज दरात 1.70 रुपये एवढी प्रति वाढ होणार आहे.

मुंबईतील कांदिवली शताब्दी रुग्णालयातील ओटी बंद,जाणून घ्या कारण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा