Advertisement

मुंब्रात ७ गोडाऊनला भीषण आग

शिळफाटाजवळील खान कंपाऊंड येथील ७ गोदामांना भीषण आग लागल्याची धक्का घटना घडली आहे.

मुंब्रात ७ गोडाऊनला भीषण आग
SHARES

शिळफाटाजवळील खान कंपाऊंड येथील ७ गोदामांना भीषण आग लागल्याची धक्का घटना घडली आहे. सोमवारी रात्री २.१५ वाजताच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीच कारण अद्याप समजलेलं नसून, पोलिस व अग्नीशमन दलाचे जवान त्याचा तपास करत आहेत. तसंच, घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

गोदामांना आग

खान कंपाऊंडमध्ये काही गोदामं असून, या गोदामांना लागली. आग भीषण असल्यामुळं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना प्रयत्न करावे लागले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ४ वॉटर टँकर व २ जंबो वॉटर टँकर, २ रेस्क्यू व्हॅन तसंच, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.


जीवितहानी नाही

या भिषण आगीत ७ गोदामांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मात्र, ही आग रात्री लागली असल्यामुळं कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.



हेही वाचा -

मुंबईतील स्कूलबससह ३२० वाहनांवर कारवाई

गॅस सिलिंडरच्या कोटिंगसाठी रसायनांचा वापर, कर्करोगाचा धोका



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा