Advertisement

गॅस सिलिंडरच्या कोटिंगसाठी रसायनांचा वापर, कर्करोगाचा धोका

घरगुती गॅस सिलिंडरच्या लेपनासाठी (कोटिंग) रसायनांचा वापर करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

गॅस सिलिंडरच्या कोटिंगसाठी रसायनांचा वापर, कर्करोगाचा धोका
SHARES

घरगुती गॅस सिलिंडरच्या लेपनासाठी (कोटिंग) रसायनांचा वापर करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. या रसायनांमुळे कर्करोग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं कर्करोग होण्याचा धोका वर्तवणारी जनहित याचिका विचारात घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला दिले आहेत. न्यायालयानं सोमवारी याबाबत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला आदेश दिले.

जनहित याचिका

पलादिन पेंटस् आणि केमिकल्स कंपनीनं जनहित याचिका करत घरगुती गॅस सिलिंडरच्या लेपनासाठी वापरण्यात येणारे रसायन आरोग्यासाठी धोकादायक असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या लेपनासाठी झिंक क्रोमेट वापरण्यात येते. त्यात मोठ्या प्रमाणावर विषारी द्रव्य असून या द्रव्यामुळं कर्करोगाचा धोका संभवतो, असा दावाही कंपनीने केला होता.

मूलभूत उत्पादन

एलपीजी गॅस हे मूलभूत उत्पादन असून, प्रत्येक घरात त्याचा वापर होतो. त्यामुळं हा धोका टाळण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळंच घरगुती गॅस सिलिंडरच्या लेपनासाठी झिंक क्रोमेटचा वापर करण्यावर बंदी घालण्याची मागणी कंपनीनं याचिकेद्वारे केली होती. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांना याबाबत केंद्र सरकारकडं प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचवेळी याचिकाकर्त्यांच्या या प्रस्तावावर आणि त्यात उपस्थित करण्यात आलेल्या धोक्यांबाबत तातडीनं आवश्यक तो निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले.



हेही वाचा -

'त्या' जाहिरातीमुळं अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात

जेएनयू हिंसाचार : गेट वेवरील आंदोलकांची आझाद मैदानात रवानगी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा