मुंबईतील स्कूलबससह ३२० वाहनांवर कारवाई

बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. मात्र, या बस अनधिकृत असल्यानं त्याच्यावर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) करण्यात येत आहे.

SHARE

मुंबईत अनधिकृत स्कूल व्हॅन व बसचं वाढल्या आहेत. या बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. मात्र, या बस अनधिकृत असल्यानं त्याच्यावर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) करण्यात येत आहे. मागील ७ महिन्यांत स्कूलबससह ३२० इतर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ५,६५,९०० रुपयांची दंडवसुल करण्यात आला असून, २४ वाहनं जप्त करण्यात आली आहेत.

वाहनांची तपासणी

आरटीओकडून राज्यात स्कूलबस तपासणी मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत मुंबईत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ३४२६ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १८२४ स्कूलबस आणि १६०४ इतर वाहनांचा समावेश आहे. यामध्ये ३२० वाहने दोषी आढळली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

विद्यार्थ्यांची वाहतूक

या कारवाईत ५ लाख ६५ हजार ९०० रुपयांची दंडवसुली करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या दुचाकीसह, स्कूलबस, रिक्षा, स्कूल व्हॅन यांची तपासणी करण्यात आली. तसंच क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक आणि चालक, सहप्रवासी, विद्यार्थी यांनी हेल्मेट परिधान न करणं, भाडं नाकारणं आदी कारणांसाठी कारवाई करण्यात आली.

३ लाख दंड वसूल

मुंबईतील वडाळा विभागात १५६९ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १२० वाहने दोषी आढळली आहेत. तसंच, या वाहनचालकांकडून ३,०५,००० रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे.

विभाग 
तपासलेली 
दोषी 
दंडवसुली
ताडदेव 
१३८ 
५४ 
१५००००
अंधेरी 
४४६ 
८६ 
६०९००
वडाळा 
१५६९ 
१२० 
३०५०००
बोरीवली 
१२७३ 
६० 
५००००
एकूण 
३४२६ 
३२० 
५६५९००हेही वाचा -

गॅस सिलिंडरच्या कोटिंगसाठी रसायनांचा वापर, कर्करोगाचा धोका

'त्या' जाहिरातीमुळं अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यातसंबंधित विषय
ताज्या बातम्या